Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी 'गूड न्यूज'; फेब्रुवारीचा हफ्ता जमा व्हायला सुरुवात, आदिती तटकरेंची मोठी घोषणा!

Ladki Bahin Yojana February installment update: फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केली असून तुमच्या खात्यात पैसे आले का ते तपासा.
Aditi Tatkare announcement Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare announcement Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin scheme beneficiary payment: राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अखेर वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिल्यामुळे राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी म्हणून दिले जातात. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून पुढील 2 ते 3 दिवसांत हा निधी थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आपल्या खात्याची पडताळणी सुरू केली आहे.

Aditi Tatkare announcement Ladki Bahin Yojana
Ashok Kharat Scam: खळबळजनक! अशोक खरातच्या 'मायाजालात' अडकले बडे मासे; SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस, धक्कादायक महिती समोर!

आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रक्रियेची सुरुवात झाल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना वेळेत निधी मिळावा यासाठी शासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळत असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मदत होत आहे.

राज्य सरकारने या योजनेला सातत्याने चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महिलांचा वाढता प्रतिसाद आणि विश्वास लक्षात घेता ही योजना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

Aditi Tatkare announcement Ladki Bahin Yojana
QR code scam : QR कोड स्कॅन करताय? सावधान! 'या' 3 गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमची एक चूक पडू शकते महागात

दरम्यान, या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. पात्रतेनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. काही महिलांनी ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरल्याचे लक्षात आल्याने दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com