Mukhyamantri Majhi Ladki bahin Yojana sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 12 हजार भावांनी घेतला लाभ; घुसखोरी करत वर्षभर लाटले पैसे

Scam in Mukhyamantri Majhi Ladki bahin Yojana : महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा यावे यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली होती.

Aslam Shanedivan

  1. लाडकी बहीण योजनेत तब्बल 12 हजार पुरुषांनी बनावट नोंदणी करून महिलांसाठी असलेला आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

  2. या पुरुषांनी जवळपास वर्षभर योजनेचा लाभ घेतल्यामुळे शासनाला मोठा आर्थिक तोटा झाला.

  3. योजनेतील या मोठ्या फसवणुकीची चौकशी सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.

Mumbai News : गेल्या काही काळापासून चर्चेत असणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कधी लाभार्थ्यांची आकडेवारी, तर कधी अपात्र लाभार्थ्यांच्या संखेवरून तर कधी योजनेत सरकारी कर्मचारी महिलांचा समावेश आणि कधी तर या योजनेत पुरूषांनी केलेल्या घुसखोरीमुळे ही योजना चर्चेत होती. आता पुन्हा एकदा या योजनेत धक्कादायक माहिती समोर आली असून गेल्या वर्षभरापासून तब्बल 12 हजार हून अधिक पूरूषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबूत इंडियन एक्स्प्रेसनं सरकारकडे माहितीच्या आधिकारात या योजनेची माहिती मागितली होती. ज्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून तब्बल 12 हजार 431 पुरूष लाभार्थ्यांनी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेतला आहे. तर अद्याप या पैशांच्या वसुलीसंदर्भात कोणतीही कारवाई अथवा सरकारने पावले उचलेली नाहीत.

राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागानं फक्त कारवाई म्हणून या पुरूषांना योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून वगळले आहे. सोबतच विभागाने विविध कारणात्सव 77 हजार 980 महिला लाभार्थ्यांनाही अपात्र ठरवत यादीतून हटवलं आहे. विशेष म्हणजे या पुरूष आणि महिला लाभार्थ्यांनी तब्बल 13 महिन्यांचा लाभ घेतला आहे.

सरकारला 164 कोटींचा चुना

या योजनेचा 77 हजार 980 महिला आणि 12 हजार 431 पुरूष लाभार्थ्यांनी वर्षभर लाभ घेतला आहे. प्रतिमहिना 1500 प्रमाणे पुरूषांनी 24 कोटी 24 लाखांचा अपहार केला आहे. तर महिला लाभार्थ्यांमुळे सुमारे 140.28 कोटींची रब्बम वर्षभरात घेतली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला सुमारे 164 कोटींचा भुर्दंड बसला आहे.

दरम्यान, मध्यंतरी राज्य सरकारच्या विविध विभागात नोकरीत असणाऱ्या व्यक्तींचा देखील या योजनेत समावेश असल्याचे समोर आले होते. ज्यात पुरुष लाभार्थीही असल्याचे उघड झाले होते. तर ही संख्या 2400 होती. या अपात्र लाभार्थ्यांची नावे देखील यादीतून हटवण्यात आली आहेत. या सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. तर त्यांच्याकडून पैसैही वसुल केले जातील अशी माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप वसुलीची कारवाई सुरू करण्यात आलेली नाही.

2.41 कोटी महिला लाभार्थी

सध्याच्या घडीला राज्यभर या योजनेचा 2.41 कोटी महिला लाभ घेत आहेत. तर सुरुवातीच्या पडताळनीत 26 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या गेल्या होत्या. आतापर्यंत 26.34 लाख संशयित लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले असून त्यांची नावे देखील यादीतून वगळण्यात आली आहेत. आता ई केवायसीमुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

FAQs :

1. लाडकी बहीण योजनेत घोटाळा कसा झाला?
→ काही पुरुषांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःला लाभार्थी दाखवून आर्थिक लाभ घेतला.

2. या घोटाळ्यात किती जण सहभागी आहेत?
→ या घोटाळ्यात सुमारे 12 हजार पुरुषांनी योजनेचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.

3. ही योजना कोणासाठी आहे?
→ ही योजना महाराष्ट्रातील पात्र महिलांसाठी असून, आर्थिक मदतीद्वारे त्यांना स्वावलंबी करण्याचा उद्देश आहे.

4. सरकारने याबाबत कोणती पावले उचलली आहेत?
→ सरकारने तपास सुरू केला असून गैरप्रकार करणाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी आहे.

5. लाडकी बहीण योजनेचा खरा लाभ कोणाला मिळतो?
→ शासनाच्या पात्रता निकषांनुसार येणाऱ्या महिलांनाच या योजनेचा खरा लाभ मिळतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT