Eknath Shinde-Pratap Sarnaik Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra flood relief politics: नेत्यांनी शोधला 'आपदा में अवसर' : अतिवृष्टी मदतीच्या आडून प्रचाराचा जोर; किटवर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे फोटो

Eknath Shinde flood relief kits News : पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे फोटो लावून मदतीचे वाटप करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : राज्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास 70 लाख एकरवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्याला गेल्या चार दिवसात मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे तर शेती तर पार खरडून गेली. काही गावातील नदीकाठच्या शेतात तर कंबरेपर्यंत पाणी शिरले आहे.

पावसाने यंदा हाहाकार उडवला आहे. त्यातच आता शेतकरी व ग्रामस्थ राज्य सरकारच्या मदतीची वाट पहात असतानाच धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी मदतीच्या आडून प्रचाराचा जोर लावला असल्याचे दिसत आहे. पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे फोटो लावून मदतीचे वाटप करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

धाराशिव जिल्हयात एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने यंदा हाहाकार उडवला आहे. अतिवृष्टी झाल्याने शेतजमीन आणि पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पंचनामे तातडीने करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यातच पुरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आलेल्या नेतेमंडळीने मात्र मदतीचे किट वाटप करीत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे फोटो लावून मदतीचे वाटप करण्यात येत आहे.

बुधवारी धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टेम्पो भरून मदतीचे किट आले आहेत. शिवसेनेकडून जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. या सर्व मदतीच्या किटवर नेतेमंडळींचे फोटो लावून वाटप करण्यात येत आहे. येत्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. दिवाळीनंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच आता या मदतीचे निमित्त साधून नेतेमंडळींकडून प्रचार केला जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्हयात पूरपरिस्थतीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. या भागातील नुकसानीचे ते पाहणी करणार आहेत. या अतिवृष्टीग्रस्त भागात प्रताप सरनाईक यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत केली जात आहे. त्यांच्यासोबत मदतीचे जवळपास 18 टेम्पो 12 साहित्यांचे किट घेऊन धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या किटचे वाटप या भागातील नागरिकांना केले जात आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना केल्या जात असलेल्या मदतीच्या किटवर नेतेमंडळींचे फोटो लावून वाटप केल्या जात असल्याच्या प्रकारावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) प्रवक्त्या सुषमा अंधारे व शेतकरी नेत्यांनी टीका केली आहे. मदत वाटप करीत असताना तरी राजकारण टाळा, अशा शब्दांत टीका केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT