Milind Narvekar Sarkarnama
महाराष्ट्र

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकर शपथ घेऊन निघाले, सत्कार घेणे का विसरले?

Pradeep Pendhare

Swearing in of Legislative Council Members : शिवसेनाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ पूर्ण झाल्यावर रजिस्टरवर सही केली. परंतु उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून सत्कार न घेताच निघाले मागे फिरले. त्यांची ही कृती अचानक घडलीय की, गोंधळ उडल्याने की, अन्य कारणांनं, याची आता चर्चा होऊ लागली आहे.

विधान परिषद निवडणुकीत विजय झालेल्या 11 सदस्यांना आज आमदारकीची शपथ देण्यात आली. विधान परिषदेत हा शपथविधी सोहळा झाला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली शपथ घेतली. शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी दहाव्या क्रमांकावर शपथ घेतली. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेताना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करत शपथ पत्र वाचण्यास सुरवात केली. शपथ पूर्ण होताच, त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानत 'जय हिंद, जय महाराष्ट्र', म्हटले.

मिलिंद नार्वेकर यांनी शपथ पूर्ण झाल्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या टेबल जवळ येत, रजिस्टरवर तिथं स्वाक्षरी केली. ही स्वाक्षरी पूर्ण होताच, मिलिंद नार्वेकर सत्कार न घेताच मागे फिरले. तिथे मागे शपथ घेऊन बसलेले भाजप (BJP) आमदार परिणय फुके आणि अधिकाऱ्यांनी चाललेल्या नार्वेकरांना थांबवले आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून स्वागत सत्कार घेण्याची आठवण करून दिली. नीलम गोऱ्हे यांच्याकडून नार्वेकर यांच्याकडून सत्कार स्वीकारत असताना त्यांच्या शेजारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उभे होते.

नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंची साथ सोडली

मिलिंद नार्वेकर यांच्याकडून ही कृती चर्चेत आली आहे. ही कृती गोंधळातून झाली की, अन्य कारणांनी आता याची चर्चा होऊ लागली आहे. निवडून आलेल्या सदस्यांना आमदारकीची शपथ दिल्यानंतर त्याचे स्वागत विधान परिषद सभापतींकडून होते. सभापती नसल्याने उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आमदारांचे स्वागत करत होत्या. शिवसेना फुटल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्या. नीलम गोऱ्हे यांच्या या निर्णयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मिलिंद नार्वेकर यांच्याकडून शपथविधी झालेली ही कृतीमुळे या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

विधान परिषद निवडणुकीत मत फुटली

विधान परिषद निवडणूक सुरशी झाली. महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. महाविकास आघाडीकडून ते मैदानात होते. शरद पवार यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशने गद्दार आमदारांचा अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. सात आमदार फुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची विधान परिषद निवडणुकीत तब्बल 20 मतं फुटल्याचा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT