Sanjay Gaikwad News : शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलाच्या जीवाला धोका असल्याचे खळबळजन पत्र समोर आले आहे. आमदार गायकवाड यांनाच हे पत्र पाठवून सावध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अशी दोन पत्र आधी आपल्याला आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या प्रकरणात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
पत्रामध्ये संजय गायकवाड यांचा छोटा मुलगा मृत्यूंजय याच्या जीवाला धोका आहे, असे सांगत वेळीच सावध राहण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच शिवाजी महाराजांची शपथ घेईन सांगतो पत्रातील मजकूर खरा असल्याचे देखील म्हटले आहे.
पत्र लिहिणाऱ्या आपली ओळख उघड केली नसून जे मृत्यूंजयला मारण्याचा प्लॅन करत आहेत आपण त्यांच्या जवळची व्यक्ती असल्याने ओळख उघड करत नसल्याचे म्हटले आहे. तसेच पत्रातील मजकूर हा खोटा नसून हा सत्य आहे. यामध्ये आपला कोणताच वैयक्तिक फायदा नसून केवळ तुमच्या कुटुंबाप्रती काळजीने हे पत्र लिहिल्याचे देखील पत्रात म्हटले आहे.
माननीय आमदारसाहेब संजयभाऊ गायकवाड 'जय महाराष्ट्र'. आदरनीय साहेब, तुम्हा पत्र लिहिव्यास कारण की, तुम्हाला एक गोपनीय माहिती द्यायची आहे. तुमचे जुने सहकारी समाधान गोरे व त्यांचा भाचा रितेश जिल्लारे यांच्या पासून तुमच्या धाकटा मुलगा मृत्यूंजयदादा गायकवाड यांच्या जीवाला धोका आहे. यांना मारण्याची सुपारी त्यांनी घेतली असून ते या कार्यासाठी सक्रिय झाले आहे. त्यांची अशी Meeting झालेली आहे. तरी आपण व आपले कुटुंब सतर्क रहावे. मी त्यांच्या जवळची व्यक्ती असून मी प्रत्यक्ष समोर येवू शकत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी लवकरात लवकर पाऊल उचलावे, वेळ निघून गेल्यावर काहीही उरणार नाही. छत्तपती शिवाजी शिवाजी महाराज आपले दैवत आहे, तुमचे आणि माझे ही. त्यांच्या छत्रपतींच्या चरणांची शप्पथ हा मजकूर खोटा नाही. आपण सतर्क राहा. मृत्यूंजय दादाची काळजी घ्या. आई भवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.