
Pune News : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात अनेक संघटनाने आक्रमकपणे आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदवला. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर होते. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.
त्याच वेळी शनिवारी भिसे यांच्या कुटुंबानी सीएम फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन व त्यांच्या अधिकृत अकाउंटवरुन या घटनेतील चिमुकल्या मुलींच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadnavis) यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणातील तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांची शनिवारी पुणे येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी भिसे कुटुंबियांचे सांत्वन केले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यासोबतच भविष्यात अशी प्रकरणे होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने एसओपी तयार करणार, असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याच वेळी या भिसे कुटुंबाच्या वतीने यावेळी हे संपूर्ण हॉस्पिटल हे धर्मदाय व्हावे आणि रुग्णाला योग्य उपचार मिळावेत, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.त्यासोबतच या प्रकरणातील दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या भेटीदरम्यान भाजप आमदार अमित गोरखे उपस्थित होते
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल झालेल्या प्रकाराची माहिती मी भिसे कुटुंबीयांकडून घेतली. या प्रकरणात संपूर्ण चौकशी होईलच आणि अहवालानुसार कारवाई सुद्धा करण्यात येईल. पण, आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही दोन्ही अपत्य आज ‘एनआयसीयू’मध्ये आहेत आणि आणखी काही काळ त्यांना तेथे उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचा खर्च सुद्धा अधिक आहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले असल्याचे सीएम फडणवीस यांनी एक्स अकाउंटवरुन म्हटले आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करता येईल, याची स्पष्टता येणार नाही. त्यामुळे अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही प्रसारमाध्यमाशी बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.