Ajit pawar, Rahul Narwekar, Sharad Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

NCP MLA Disqualification Case Result : शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालात 'हे' मुद्दे ठरले महत्त्वपूर्ण

Sachin Waghmare

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात भूकंप घडविणारा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी सायंकाळी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर गेल्या तीन महिन्यांपासूनची सुरू असलेली सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून पार पडली.

गेल्या आठ महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर निकाल देताना शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालात 'हे' मुद्दे महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

अजित पवार गटाकडे विधिमंडळात बहुमत असल्याने अजित पवार यांचा गट मुळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे स्पष्ट होते.अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार असल्याचे दिसते. शरद पवार गटाकडूनही 41 आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. यावरूनच कुणाकडे बहुमत आहे हे दिसते. त्यामुळे अजित पवार गटाकडे बहुमत असल्याचे स्पष्ट होते. घटनेनुसार पक्षांतर्गत झालेल्या प्रतिनिधी निवडणुकांचे पुरावे शरद पवार गटाकडून देण्यात आले नाहीत.

29 जून 2023 पर्यंत शरद पवारांच्या (Sharad Pawar) अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आले नाही. ३० जून रोजी दोन्ही गटांकडून दावा करण्यात आला. दोन्ही गटांकडून घटनेनुसार नेतृत्वाची निवड केल्याचा दावा करण्यात आला. दोन्ही गटांकडून याबाबत बाजू मांडण्यात आली.

R

SCROLL FOR NEXT