NCP MLA Disqualification Case Result : शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच...

Rahul Narwekar on NCP MLA Disqualification Live in Marathi : विधिमंडळातील बहुमत ठरले महत्त्वाचे, अजित पवार गटाकडे 41 आमदार
Rahul Narwekar, Ajit Pawar, Sharad pawar
Rahul Narwekar, Ajit Pawar, Sharad pawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेत सहभागी होताच राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला. मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे जाहीरही केले. यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले, तर आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गुरुवारी निकाल दिला. या वेळी विधिमंडळातील बहुमत लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचे जाहीर केले.

अजित पवारांकडे पक्षाचे 53 पैकी 41आमदार आहेत, तर शरद पवारांनी आपल्याकडे पक्षाचे प्रतिनिधी असल्याचा दावा केला होता. निकाल देताना मात्र नार्वेकरांनी शरद पवारांकडे प्रतिनिधी निवडीचे कुठलेही पुरावे नसल्याचे सांगितले. तसेच विधिमंडळातील बहुमत लक्षात घेत राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्यावर शिक्कामोर्तब केले.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात तीन, तर अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) गटाविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांचे दोन गट करण्यात आले असून, दोन्ही गटांचे स्वतंत्र निकाल देण्यात येणार आहेत. दोन्ही गटांकडून मूळ पक्ष असल्याचा दावा केला आहे.

या याचिकांद्वारे दोन्ही गटांनी आपलाच गट मूळ पक्ष असल्याचा दावा केला. त्यानुसार आमदार अपात्रता निकाल देण्याआधी पक्ष कुणाचा हा निर्णय घ्यावा लागणार आहे. पक्षाची घटना, पदांची रचना, विधिमंडळातील संख्याबळ विचारात घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाने सांगितल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल वाचनाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.

Rahul Narwekar, Ajit Pawar, Sharad pawar
Nilesh Rane : भास्कर जाधवांच्या मतदारसंघात उद्या नीलेश राणेंची तोफ धडाडणार; चिपळूण, गुहागरवर पोलिसांचा वॉच

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यासाठी नार्वेकरांना 31 जानेवारी ही अंतिम मुदत दिली होती. यानंतरही अध्यक्षांनी सुनावणीसाठी कोर्टाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तत्पूर्वी आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांपुढे 6 जानेवारी ते 27 जानेवारी या काळात सुनावणी पूर्ण झाली होती. या सुनावणीत अजित पवार गटाकडून नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटली. त्यानंतर मूळ पक्षांच्या प्रतोदांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार आमदार अपात्रतेवर चर्चा झडली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विधिमंडळातील संख्याबळ आणि शिवसेनेची बदलेल्या घटनेबाबत निवडणूक आयोगाला माहिती दिली नाही, यावर बोट ठेवून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्णय दिला.

यानंतर गुरुवारी (ता. १५ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रतेवरील निकालाचे वाचन केले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या घटनेनुसार नेतृत्व निवडल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले, तर राष्ट्रवादी नेमकी कुणाची, हे ठरवताना विधिमडळातील बहुमत कुणाकडे आहे, हाच मुद्दा ग्राह्य धरला. शरद पवारांनी बहुमतासाठी कार्यकारिणीचे प्रतिनिधी आपल्याकडे असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्या निवडीचे पुरावे नसल्याकडे नार्वेकरांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Rahul Narwekar, Ajit Pawar, Sharad pawar
Maratha Reservation : जरांगे-पाटलांना उपचार घेण्यात अडचण काय? हायकोर्टाचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com