Mumbai Political News : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांना बहाल केले. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी दिला आहे. निकालात अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले गेले आहेत. यामुळे हा शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का आहे. (Latest Marathi News)
अजित पवार गट (AJit Pawar) आणि शरद पवार गट यांच्याकडून आमदार अपात्रतेसंबंधी याचिका दाखल केल्या आहेत. या एकूण पाच याचिकांवर नार्वेकर यांनी आपला निकाल दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचीच असून, अजित पवार गटातील सर्व आमदार हे पात्र आहेत, असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे, यामुळे शरद पवार यांना हा फार मोठा धक्का आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार गटातील सर्व आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शरद पवार गटाची होती. यासाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रसे पार्टी अजित पवारांचीच यावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.