Tanaji Jadhav  Sarkarnama
महाराष्ट्र

school management controversy : प्रभारी मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल, संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळला अन्...

Maharashtra education News : लोहारा तालुक्यातील संस्थाचालक, सहकारी कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापकाने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्रकार उघडकीस आला.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : लोहारा तालुक्यातील होळी येथील म. गां. विद्यालयाचे संस्थाचालक, सहकारी कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापकाने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी या मुख्यध्यापकाने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये संस्थाचालक व सहकारी कर्मचाऱ्याच्या नावाचा उल्लेख त्यामध्ये केला आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोहारा तालुक्यातील होळी येथील म. गां. विद्यालयाचे संस्थाचालक, सहकारी कर्मचाऱ्यांच्या जाचामुळे येथील प्रभारी मुख्यध्यापक तानाजी विठ्ठलराव जाधव यांनी रविवारी संध्याकाळी 7:30 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाधव यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये येथील संस्थाचालक व सहकाऱ्यांच्या होत असलेल्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. संबंधित सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी संस्थेचे अध्यक्ष, सचिव व विद्यालयातील तीन सहकारी शिक्षक कर्मचारी यांची नावे लिहली आहेत. त्यांच्याकडून कशा प्रकारे त्रास दिला जात होता, याबाबतच उल्लेख यामध्ये त्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT