

BJP Congress clash in Pune latest updates : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानच्याच्या विरोधात पुण्यात भाजपने आंदोलन केले. काँग्रेस भवन बाहेर भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करीत असताना भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे पुण्यात काँग्रेस भवनासमोर जोरदार राडा झाला.
सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. या दगडफेकीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दगडफेकीच्या या प्रकारानंतर पोलिसांनी भाजप आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी तसेच, सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
काँग्रेस भवन परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या दगडफेकीत काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन कार्यकर्ते, दोन पोलिस कर्मचारी आणि दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी परस्परांवर आरोप- प्रत्यारोप केले.
या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह सुमारे ५० ते ६० भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, भाजप कार्यकर्त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसबा विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष गौरव बाळंदे, युवक काँग्रेसचे अक्षय जैन, सागर धाडवे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.