sharad pawar narendra modi sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar News : "मोदींनी तर कुठं कुटुंब सांभाळलं", शरद पवारांनी दाबली दुखरी नस

Sharad Pawar On Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरे यांना मोदी यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये," असंही शरद पवार यांनी म्हटलं.

Akshay Sabale

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. शरद पवार यांना कुटुंब सांभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार? अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. या टीकेला शरद पवार यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. मोदी यांनी तर कुठं कुटुंब सांभाळलं, अशा शब्दांत शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

"राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यामुळे फुटली नाही. नेतृत्व कोण करणार? यावरून पवारांच्या घरात भांडण आहे. कुटुंब सांभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार?" असा हल्लाबोल मोदी ( Narendra Modi ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना विचारलं. शरद पवार म्हणाले, "मोदी यांनी तर कुठं कुटुंब सांभाळलं. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय चिंताजनक आहे. पण, मी त्या थराला जाऊन बोलणार नाही. आपण कोणाबद्दल, असं व्यक्तिगत बोलू नये. ते पथ्य मोदी यांनी पाळलं नाही. त्यामुळे आपणंही पाळायचं नाही, असं वागणं योग्य नाही."

'उद्धव ठाकरे अडचणीत असतील, तेव्हा मदत करणार पहिला व्यक्ती मी असेन', असंही मोदी म्हणाले होते. यावर शरद पवार यांनी म्हटलं, "उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आपण, त्यांची विचारपूस केली. याबद्दल मोदी लाखवेळा बोलतील. पण, आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरे यांना मोदी यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT