Loksabha Election : सांगलीच्या लोकसभा जागेवरून शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस Congress यांच्यामध्ये नाराजी नाट्य पाहण्यास मिळाले. विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी बाबत शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
टीव्हीवरच आम्हाला चंद्रहार पाटील Chandrahar Patil यांची उमेदवारी कळाली. याबाबत चर्चा झाली नाही, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक असताना देखील ठाकरे गटाने चंद्रहार पाटील Vishal Patil यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबतचा गुंता अधिक वाढल्याच्या चर्चा आहे.
विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या बाजीराव खाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, विशाल पाटील यांच्यावर कारवाईसाठी समिती नेमत तिचा अहवाल हायकमांड देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. अखेर काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात येत आहेत.
विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यावेळीच आंबेडकरांनी विशाल पाटील अपक्ष लढले तर त्यांना पाठींबा देऊ असे जाहीर केले होते. अखेर विशाल पाटील यांनी अपक्ष लढत असताना वंचितने त्यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून संजयकाका पाटील, ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील निवडणूक रिंगणात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.