Shiv Sena, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : ठाकरेंच्या ‘या’ 16 जागा निश्चित; चार जागांचा तिढा कायम

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर झाल्या तरी अद्याप महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला वाट्याला येणाऱ्या जवळपास सोळा जागा निश्चित झाल्या असून, उमेदवारही ठरल्याचे समजते. मात्र, अजूनही चार जागांवर आघाडीत बोलणी सुरू असल्याने उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर केली जात नाहीत. त्यामुळे आघाडीत शिवसेनेला (Shiv Sena) सर्वाधिक 20 ते 22 जागा मिळू शकतात.

असे आहेत मतदारसंघनिहाय संभाव्य उमेदवार -

1. विनोद घोसाळकर, उत्तर मुंबई

2. संजयदिना पाटील,  इशान्य मु़बई

3. अरविंद सावंत, दक्षिण मुंबई

4. अनिल देसाई,  दक्षिण मध्य मुंबई

5. चंद्रकांत खैरे, छत्रपती संभाजीनगर

6. नरेंद्र खेडकर, बुलडाणा

7. संजय देशमुख, यवतमाळ

8. ओमराजे  निंबाळकर, उस्मानाबाद

9. संजय जाधव, परभणी

10. भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी

11. विजय करंजकर, नाशिक

12. राजन विचारे, ठाणे

13. अनंत गिते, रायगड

14. नागेश अष्टीकर, हिंगोली

15. विनायक राऊत, रत्नागिरी- सिंधुदुर्ग

16. चंद्रहार पाटील, सांगली

या जागांचा तिढा कायम

17. कल्याण डोंबिवली

18. संजोग वाघेरे, मावळ

19. पालघर

20. जालना

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT