Tamilisai Soundararajan News : तेलंगणाच्या राज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं काय आहे कारण?

Lok Sabha Election 2024 : तमिलीसाई सुंदरराजन या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता तेलंगणाला नवे राज्यपाल मिळतील.
Tamilisai Soundararajan
Tamilisai SoundararajanSarkarnama
Published on
Updated on

Telangana News : काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये राजकीय उलथापालथ झाली. मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना दुसऱ्याच दिवशी लोकसभेचे तिकीट जाहीर झाले. त्यानंतर आज तेलंगणाच्या राज्यपाल पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन (Tamilisai Soundararajan News) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्यपाल (Governor) तमिलीसाई सुंदरराजन यांनी सोमवारी सकाळी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवला. त्या तमिळनाडू (Tamil Nadu) भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्ष असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

Tamilisai Soundararajan
Electoral Bond News : अजब बाँडची गजब कहाणी! निनावी लिफाफ्यातून थेट पक्ष कार्यालयात दहा-दहा कोटींची देणगी

भाजपच्या (BJP) तिसऱ्या उमेदवारी यादीत तमिलीसाई सुंदरराजन यांचे नाव येऊ शकते. भाजपने दक्षिणेतील राज्यांमध्येही अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी मातब्बर उमेदवार रिंगणात उतरवले जात आहेत. त्यामुळे सुंदरराजन यांनाही राज्यपाल पदाचा राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 400 पारचा नारा दिला आहे. एकट्या भाजपला 370 जागा मिळतील, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात अनुभवी आणि निवडून येण्याचा निकष पाहून उमेदवार दिले जात आहेत. मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगून भाजपने त्याची प्रचिती दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दक्षिणेकडील एकाही राज्यात भाजपची सत्ता नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या विविध ओपिनियन पोलमध्येही भाजपला फारशा जागा मिळताना दिसत नाहीत. त्यादृष्टीने भाजपकडून आता रणनीती आखली जात आहे. मात्र, आंध्र प्रदेश वगळता दक्षिणेतील एका राज्यात भाजपला मोठा मित्रपक्ष नाही. त्यामुळे एकला चलोची भूमिका घेत निवडणुकीत उतरावे लागणार आहे. आंध्रमध्ये टीडीपीने भाजपची साथ दिली आहे.

कर्नाटकमध्ये भाजपला बऱ्यापैकी संधी आहे. मात्र, केरळ, तामिळनाडू, आंध्रमध्ये एकही जागा मिळणार नाही, असे काही ओपिनियन पोलमध्ये दिसते. तेलंगणामध्येही भाजपला अपेक्षित यश मिळणार नाही, असे वातावरण आहे. तुलनेने काँग्रेसला (Congress) केरळ, तामिळनाडूत चांगल्या जागा मिळू शकतात, तर सत्ता असूनही कर्नाटकमध्ये पक्षाची कामगिरी चिंताजनक असेल, असे पोलमध्ये दिसते.

R

Tamilisai Soundararajan
Assembly Bypolls 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com