Devendra Fadnavis | Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : महायुतीत बिनसलं? भाजप दवाबतंत्राचा वापर करतंय; शिंदे गटातील नेत्याचा आरोप

Akshay Sabale

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, तरी महायुतीचं जागावाटप अद्याप रखडलं आहे. ठाणे, कल्याण, धाराशिव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग यासह शिंदे गटाच्या काही जागांवर भाजपनं दावा सांगितला आहे.

तसेच, काही ठिकाणी उमेदवार बदलासाठी शिंदे गटाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असून, शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. यावरून माजी मंत्री सुरेश नवले (Suresh Navale) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

"उमेदवार बदलासाठी भाजप दवाबतंत्राचा अवलंब करत आहे. पण, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदार, खासदारांमुळे भाजप सत्तेची फळ चाखतंय," अशा शब्दांत सुरेश नवले यांनी सुनावलं आहे. ते एका प्रसारमाध्यमाशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"उमेदवारांबाबत नकारात्मक अहवाल"

सुरेश नवले म्हणाले, "एकनाथ शिंदेंबरोबर (Eknath Shinde) आलेल्या खासदारांना तिकीट मिळावं ही अपेक्षा आहे. खासदारांना तिकीट देण्याची तीव्र इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे. पण, भाजप (BJP) दवाबतंत्राचा अवलंब करून उमेदवार पात्र नसल्याचं सांगतंय. आयबीच्या सर्व्हेंचा अहवाल खासदारांबाबत नकारात्मक असल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे."

"भाजप सत्तेची फळ चाखतंय"

"एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदार, खासदारांमुळे भाजप सत्तेची फळ चाखतंय. हेच भाजप एकनाथ शिंदेंबरोबर आलेल्या आमदार आणि खासदारांना बाजूला करत आहे. लोकसभेला ही स्थिती असेल, तर विधानसभेला काय होणार? विश्वासात घेऊन भाजपनं काम केलं पाहिजे. पण, तथाकथित अहवाल तयार करून उमेदवारी कापली जात आहे," असा आरोप नवलेंनी भाजपवर केला.

"पाटील, मानेंना तिकीट देऊ नये म्हणून प्रयत्न"

"हेमंत पाटील, धैर्यशिल मानेंना तिकीट देऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातात. हे अनाठायी आहे," असा संतापही नवलेंनी व्यक्त केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT