Eknath Shinde : 'कल्याण'साठी ठाण्याच्या जागेवर सोडावं लागणार पाणी? ; शिंदे कसा सोडवणार तिढा

Thane Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे मतदारसंघावर (Thane Constituency) भाजप आपला दावा कायम ठेवून आहे. ठाण्याची जागा मिळावी, यासाठी भाजपने कल्याणमधून शिंदे यांची कोंडी केल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde, Shrikant Shinde
Eknath Shinde, Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombiwali Loksabha News :लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर होत आहे. मात्र, महायुतीत जागावाटपात ठाणे व कल्याणच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे मतदारसंघावर (Thane Constituency) भाजप आपला दावा कायम ठेवून आहे. ठाण्याची जागा मिळावी यासाठी भाजपने कल्याणमधून शिंदे यांची कोंडी केल्याची चर्चा आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उमेदवारी कल्याणमधून निश्चित असल्याचा प्रचार भाजपनेच येथे मेळावे घेत सुरू केला. त्या मेळाव्यांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र उघड उघड नाराजी दाखविली असून, भाजपचे (BJP) मंत्री चव्हाण यांनीदेखील अप्रत्यक्षरित्या आमच्या सहकाऱ्यांशिवाय पर्याय नसल्याचे शिंदे यांना दाखवून देत असल्याचे जाणकार सांगत आहेत.

ठाण्यात चिन्ह तुमचे उमेदवार आमचा असा प्रस्तावदेखील भाजपने सेनेपुढे ठेवला असल्याची माहिती असून, कल्याणची जागा हवी तर ठाण्याचा हट्ट शिंदे यांना सोडावा लागेल, असाच पवित्रा भाजपने घेतल्याची माहिती जाणकारांनी दिली. महायुतीच्या या तिढ्यामुळे ठाकरे गटाचीदेखील कोंडी झाली असून, त्यांनाही आपला उमेदवार अद्याप निश्चित करता आलेला नाही. How will BJP's strategy solve the Shinde?

महायुतीच्या जागावाटपाच्या पहिल्या फेरीत मुख्यमंत्र्यांनी बाजी मारत आत्तापर्यंत आपल्या सात खासदारांना उमेदवारी मिळवून दिली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा असलेल्या ठाणे, पालघर, कल्याण या मतदारसंघांतील चित्र अजूनही स्पष्ट झालेले नसल्याने शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Shrikant Shinde
Loksabha Election 2024 : मध्यरात्री तीनपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक, नेमकं काय ठरलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी सुरुवातीपासून शिवसेनेने प्रयत्न केले आहेत. शिवसेना व भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आणि त्यातच भाजपने (BJP) कल्याण लोकसभा मतदारसंघावर (Loksabha Constituency) आपला दावा करत शिंदे यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा केला. मनसेची महायुतीसोबत दिलजमाई झाली आणि भाजपचे सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी आचारसंहितेच्या पूर्वी विकासकामांच्या वेळी खासदार शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा करत शिंदे यांना खूष केले. मात्र, त्यानंतर दिव्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथे उमेदवार कोणी असो त्याने कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असे निवेदन पक्ष प्रदेशाध्यक्षांना देत शिंदे यांच्याविषयी असलेली नाराजी उघड केली. यानंतर मंत्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघात मेळावे घेतले गेले. या मेळाव्यात शिंदे यांच्याविषयी डोंबिवली येथील कार्यकर्त्यांनीदेखील नाराजी असल्याचे घोषणाबाजी करत दाखवून दिले

ठाणे मतदारसंघावर (Thane Constituency) भाजप आपला दावा कायम ठेवून आहे. भाजपचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक (Sanjiv Naik) यांच्यासाठी भाजपने या जागेवर दावा केला आहे. ही जागा मुख्यमंत्री यांना सोडावी लागली तरी दोघांच्या सहमतीचा उमेदवार म्हणून नाईक यांनी धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढवावी, असा प्रस्तावदेखील भाजपने शिंदे यांच्यासमोर मांडला आहे. यामुळे ठाण्यातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

तसेच या मतदारसंघातील काही चाणक्यांनी केलेल्या सर्वेक्षणात शिंदे यांच्या विजयाबाबत साशंकता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कल्याणच्या जागेवर डोळा असलेले भाजपचे कार्यकर्तेदेखील अशा चर्चांना उधाण आणत आहेत.

शिंदे यांनी ठाणे मतदारसंघ सोडला नाही तर कल्याणवर भाजप दावा करेल. महायुतीचा (Mahayuti) उमेदवार जाहीर होत नसल्याने महाविकास आघाडीच्या ठाकरे गटालादेखील येथे आपला उमेदवार निवडताना कोंडी होत आहे. ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर करून शिवसेना ठाकरे गटाला झुलवत ठेवणे, त्यांना जास्त संधी न देणे हेदेखील उमेदवार जाहीर न करण्यामागचा उद्देश असल्याचे काही शिवसैनिकांचे मत आहे.

Edited BY : Rashmi Mane

R

Eknath Shinde, Shrikant Shinde
Lok Sabha Election 2024 : 'वंचितचा स्वबळाचा निर्णय योग्यच; महाविकास आघाडीला लुटालूट...' ; आठवले स्पष्टच बोलले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com