Nilesh lanke, Praniti shinde, Pratibha dhanorkar  Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election Result News : राज्यातील खासदार झालेल्या सातपैकी 'या' पाच जणांचा राजीनामा

Political News : काँग्रेसचे चार, शिवसेना शिंदे गटाचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने विजय मिळवला होता. या सात आमदारापैकी 5 आमदारांनी राजीनामा दिला आहे

Sachin Waghmare

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेतील सुमारे 16 आमदार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यापैकी सातजण विजयी झाले तर नऊ जण पराभूत झाले आहेत.

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत जवळपास 14 खासदारांची उमेदवारी कापण्यात आली होती. त्या जागी काही आमदारांना संधी देण्यात आली होती. त्यामध्ये काँग्रेसचे (Congress) चार, शिवसेना शिंदे गटाचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने विजय मिळवला होता. या सात आमदारापैकी 5 आमदारांनी राजीनामा दिला आहे.

लोकसभेवर निवडून गेलेल्यांपैकी 5 आमदारांनी राजीनामे दिलेले आहेत. त्या सगळ्यांचे राजीनामे मी स्वीकारले आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar), रवींद्र वायकर, बळवंत वानखेडे, संदीपान भुमरे यांनी राजीनामा दिल्याचे समजते. अद्याप प्रणिती शिंदे यांनी राजीनामा दिला नसल्याचे समजते तर निलेश लंके यांनी निवडणुकीपूर्वीच अजित पवार गट सोडत असतानाच आमदारकीचा राजीनामा दिला होता.

लोकसभेची निवडणूक 16 आमदाराने लढवली होती, पण त्यातील सात जण निवडून आले तर दुसरीकडे नऊ आमदारांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. ऐन निवडणुकीपूर्वी रामटेकमधील काँग्रेसचे आमदार राजीव पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. रामटेकमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता ते विधानसभेचे सदस्य नसतील.

या आमदाराला स्वीकारावा लागला पराभव

लोकसभा निवडणूक लढविलेले नागपूरमधील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, वनमंत्री सुधीर मनगंटीवार, शिवसेना शिंदे गटाचे राजीव पारवे, राजेश पाटील, रासपचे महादेव जानकर, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, भाजपचे मिहीर कोटेचा, शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

हे आमदार झाले खासदार

काँग्रेसचे बळवंत वानखेडे अमरावतीमधून, शिंदे गटाचे रवींद्र वायकर मुंबईतून, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड उत्तर मुंबईतून, प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सोलापूरमधून, प्रतिभा धानोरकर चंद्रपूरमधून, शरद पवार गटाचे निलेश लंके अहमदनगरमधून, शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून विजय मिळवला.

SCROLL FOR NEXT