Nitin Gadkari and Vikas Thakre
Nitin Gadkari and Vikas Thakre Sarkarnama
महाराष्ट्र

Nitin Gadkari : 'चल न बे...'म्हणत नागपुरात मतदान सुरू; गडकरींचा 'विकास' सरस ठरतो की, काँग्रेसचा 'विकास'?

Sachin Deshpande

Nagpur Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या नागपूर येथे विकास ठाकरे यांची थेट लढत तीन वेळा सलग विजयी झालेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर आहे.

असे असताना या ठिकाणी काँग्रेसनेदेखील तगडा उमेदवार देत जोरदार प्रचार केला. नागपुरात प्रचलित अशी कुणाला कुठे सोबत नेण्यासाठी 'चल न बे....'असे म्हणत ऐकमेकांना सोबत घेत मतदान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारी ठरणार महाराष्ट्राचा ट्रेंड निश्चित होईल.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यात आज सकाळपासूनच विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर नेत्यांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशात केंद्रीय मंत्री असताना पन्नास लाख कोटींचे रस्ते निर्मिती केली होती. आज होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाला कौल देते हे पाहण्यासारखे ठरेल. नागपूर येथे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे 54 टक्के मतदान झाले होते.

यंदा ही टक्केवारी 75 टक्क्यांवर न्यावयाची आहे. यासाठी सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. विशेषतः नागपूर बाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपुरात यावे.

सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी जरूर सहभागी व्हावे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. इटनकर या वेळी म्हणाले. तापत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था मतदारांची करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर जिल्ह्यात एकूण 4510 मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे आहेत. यात सहायकारी मतदान केंद्रांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी या वेळी दिली.

या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके उद्या, दि. 18 एप्रिल रोजी मतदानस्थळी रवाना होणार आहेत. मतदान पथकांसोबत प्राथमिक वैद्यकीय किट, ग्लुकोज असणार आहे.

आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 12 महिला मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक विधानसभेत प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहे.

नितीन गडकरी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 5,87,767 मते मिळविली होती. तर काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेवार यांनी 3,02,939 प्राप्त केली होती. नितीन गडकरी यांनी गेल्या निवडणुकीत 54 टक्के मते घेत विजय मिळविला होता.

त्यांचा लीड हा 2,84,828 इतका होता. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांना 2014 च्या तुलनेत मतदान अधिक झाले. भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना 6,60,221 मते मिळाली. तर काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना 4,44,212 मते मिळाली. 2019 मध्ये नितीन गडकरी यांनी 2,16,009 अधिक मते मिळवित विजय संपादित केला होता.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

नागपूर लोकसभेसाठी 321 पोलिस अधिकारी, 4 हजार 250 पोलिस कर्मचारी आणि 1 हजार 800 होमगार्डस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथक असणार आहेत.

संवेदनशील केंद्रामध्ये अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत. देवलापार येथे आदिवासी मतदान केंद्र असणार आहे. मतदान सुरू होताच सुरुवातीच्या मतदारांचे पारंपरिक आदिवासी पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे.

यासोबतच दिव्यांग, युवा अशी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच काही मतदान केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर मतदान केंद्रांवर टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT