Google Doodle : गुगलचा भारतीय लोकशाहीला अनोखा सलाम; मतदारांना प्रेरित करणारे गुगलचे 'डुडल' !

Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : आज देशातील 21 राज्यांतील 102 लोकसभा मतदारसंघांत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 चे पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यासाठी गुगलने प्रेरित करणारे डुडल प्रसारित केले आहे.
Google Doodle
Google DoodleSarkarnama

Lok Sabha Election 2024 : देशात आज पहिल्या टप्प्यातील 102 लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. यात एकूण 1625 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 1491 पुरुष उमेदवार असून, 134 महिला उमेदवार रिंगणात आहेत.

महिला उमेदवारांची टक्केवारी केवळ 8 टक्के इतकी आहे. या उमेदवारांना लाखो मतदार आज मतदान करतील. या लाखो मतदारांना प्रेरित करण्यासाठी गुगल (Google) ने त्याचे डुडल (Doodle) भारतीय लोकशाहीला समर्पित केले आहे.

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून परिचित असलेल्या भारतात लोकशाहीचा उत्सव आजपासून सुरू होत आहे. आज देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे पहिल्या टप्प्यातील इलेक्शन आहे. यात लाखोंच्या संख्येत मतदार सहभागी होणार आहेत.

गुगल ने त्याचे डुडल चेंज करत भारताच्या लोकशाहीला सलाम केला आहे. डाव्या हाताच्या तर्जनीला शाई असलेले चित्र गुगलच्या डुडलने तयार करत गुगलने मताधिकार वापरण्याचा सल्ला आज लाखो गुगल युजर्सला दिला आहे.

गुगल त्याचे डुडल यात नेहमीच बदल केला आहे. इतर देशातील मतदान प्रक्रियेवर डुडल अर्थात चित्र गुगलने यापूर्वी वापरले आहे. पण, त्यात मतदानाची पेटी आणि मतपत्रिका याचा समावेश गुगलने केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Google Doodle
Utkarsha Rupwate: ...अखेर शिर्डीत 'मविआ'ला ज्याची भीती होती, तीच गोष्ट घडली! वंचितकडून उत्कर्षा रुपवतेंना उमेदवारी

भारतीय लोकशाहीत डाव्या हाताच्या तर्जनी अर्थात इंडेक्स फिंगरला शाई लावली जाते आणि ही शाई न पुसणारी अशीच असते. जो कोणी मतदार मतदान करतो त्याच्या तर्जनीच्या मागे नख आणि त्वचा यांना दोघांना ही शाई लावली जाते.

ही शाई आज गुगलने डुडलच्या माध्यमातून अधोरेखित केली आहे. ही शाई तर्जनीला लागलेली असणे म्हणजे लोकशाहीत मतदान करण्याचे कर्तव्य मतदारांनी पूर्ण केल्याचे चित्र निर्माण करते. गुगल ने डुडलच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी प्रेरित करणारे डुडल समोर केले आहे.

यामुळे लाखो मतदात्यांना त्यांचे कर्तव्याची जाण आज गुगलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. लोकशाहीत मतदात्यांनी त्यांचा मतदानाचा अधिकार वापरण्याची गरज आहे. त्यासाठी आज गुगल डुडल लान्च करत भारताच्या सशक्त लोकशाहीला एक प्रकारे सलाम केला आहे.

मतदान करण्याआधी मतदाराच्या बोटाला शाई लावली जाते. त्यावरून व्यक्तीने मतदान केले आहे की नाही हे लक्षात येते. ज्यामुळे बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला ओळखता येते. त्याच बरोबर बोगस व पुनर्मतदान रोखले जाते.

शाई मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला लावली जाते. लोक मतदान केल्यानंतर अभिमानाने आम्ही मतदान केले असे बोट दाखवत सेल्फीही काढतात. व्यक्तीच्या डाव्या हाताला तर्जनी नसेल तर, निवडणूक घेणे नियम 1961 च्या नियम के 49 नुसार, व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही इतर बोटाला शाई लावता येते.

जर त्या व्यक्तीच्या डाव्या हाताला एकही बोट नसेल, तर त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जाते. त्या व्यक्तीला उजवी तर्जनीही नसेल, तर उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावली जाते. मतदान करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला दोन्ही तळहात नसतील. तळहातावर बोटे नसतील, तर त्याचा हात जिथून दुखावला गेला आहे त्या टोकाला शाई लावली जाते.

लोकसभा निवडणुक 2019 गुगल ने वापरलेले डूडल
लोकसभा निवडणुक 2019 गुगल ने वापरलेले डूडलSarkarnama

गुगल ने 2019 मध्येदेखील अशाच प्रकारे डूडल च्या माध्यमातून लोकशाही बळकटीकरण आणि मतदारांना मतदानासाठी प्रेरित करणारे डुडल लाॅन्च केले होते. 2019 च्या 19 मे रोजी गुगल ने हे डुडल लाॅन्च केले होते.

अगदी तसेच डुडल यंदा ही गुगलने मतदारांसाठी प्रसारित केले आहे. गुगल यंदा पहिल्या टप्प्यातील इलेक्शनच्या पहिल्या दिवशी हे डुडल लाॅन्च केले आहे. 2019 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने शाईच्या 26 लाख बॉटल खरेदी केल्या होत्या.

यासाठी 33 कोटी रुपयांचा खर्च आला होता. आयोगाने यावर्षी 26.55 लाख शाईच्या बॉटल खरेदी केल्या आहेत. यासाठी तब्बल 55 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. शाईमध्ये सिल्वर नायट्रेट हा प्रमुख घटक असतो.

देशातील फक्त एक कंपनी या शाईची निर्मिती करते. म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड (एमपीवीएल) या कंपनीच्या माध्यमातून शाईची निर्मिती केली जाते. 1962 मध्ये पहिल्यांदाच शाईचा वापर करण्यात आला होता. भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये शाईंचा वापर सुरू होऊन लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 62 वर्षे होत आहेत.

R

Google Doodle
Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी मतदारांशी महागद्दारी केली; शिरूरमध्ये महायुती आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com