Maratha MP sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election Result : महाराष्ट्रातून 26 मराठा खासदार लोकसभेत, ओबीसी किती?

26 Maratha MP Win in Maharashtra Lok Sabha : अनुसूचित जमातीची चार तर, अनुसूचित जातीचे सहा खासदार महाराष्ट्रातून विजयी झाले आहेत.

Roshan More

Lok Sabha Election : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीत चर्चेत होता. जरागेंच्या आंदोलनामुळे भाजपला फटका बसल्याचीही चर्चा आहे. मात्र, महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित 48 खासदारांपैकी 26 खासदार मराठा तर, 9 खासदार ओबीसी आहेत.

अनुसूचित जमातीची चार तर, अनुसूचित जातीचे सहा खासदार महाराष्ट्रातून विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे अनुसूचित जातीमधील असलेल्या वर्षा गायकवाड Varsha Gaikwad या खुल्या प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत.

महाविकास आघाडीकडून 26 मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील 14 जण विजयी झाले. तर, महायुतीचे 11 मराठा उमेदवार विजयी झाले आहेत.

मराठवाड्यात महायुतीला फटका

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक जोर हा मराठवाड्यात होता. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातच मोठी आंदोलने झाली. या आंदोलनांचा फटका महायुतीला बसल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील आठ जागांपैकी अवघी एक छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीला मिळाली आहे. सात जागांवर महायुतीचा पराभव झाला.

मराठा समाजाचे खासदार

  1. उदयनराजे भोसले

  2. शाहू छत्रपती

  3. विशाल पाटील

  4. सुप्रिया सुळे

  5. धैर्यशील मोहिते

  6. धैर्यशील माने

  7. श्रीरंग बारणे

  8. स्मिता वाघ

  9. शोभा बच्छाव

  10. नारायण राणे

  11. मुरलीधर मोहोळ

  12. श्रीकांत शिंदे

  13. नरेश म्हस्के

  14. ओमराजे निंबाळकर

  15. संजय देशमुख

  16. अरविंद सावंत

  17. प्रतापराव जाधव

  18. नागेश आष्टीकर

  19. संजय जाधव

  20. बजरंग सोनवणे

  21. अनुप छोत्रे

  22. राजाभाऊ वाजे

  23. नीलेश लंके

  24. कल्याण काळे

  25. संदीपान भुमेरे

  26. वसंत चव्हाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT