Ajit Pawar, CM Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : शिंदे-फडणवीस-अजित पवारांसाठी 'या' सर्व्हेने दिली 'GOOD NEWS'

Shinde-Fadnavis-Ajit Pawar News : सर्व्हेनुसार महाराष्ट्रात एनडीए आघाडीला मिळाणार इतक्या जागा, तर विराधकांचा होणार सुपडा साफ?

Mayur Ratnaparkhe

NDA Alliance and Loksabha Election 2024 : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती होत आहे. राजकीय पक्षांसह सर्व सामान्य जनतेला निवडणुकीचे वेळापत्रक कधी जाहीर होते याची उत्सुकता आहे. राजकीय पक्षांमध्ये मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. तर इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.

महाराष्ट्रात मागील दोन वर्षांत प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची सगळी गणितं बदलली आहेत. अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्रातील निकालाकडे असणार आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीकडून लोकसभा(Loksabha Election 2024) निवडणुकीवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशावेळी शिंदे-फडणवीस अन् अजित पवारांसाठी एका सर्व्हेमधून 'गुड न्यूज' समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'झी न्यूज'च्या ओपिनियन पोलनुसार एनडीए आघाडीला(NDA Alliance) महाराष्ट्रात घवघवीत यश मिळणार असून तब्बल 45 जागांवर विजय मिळणार आहे. तर विरोधी महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या तीन जागा येणार आहेत. अशी खळबळजनक माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे.

या सर्व्हेमध्ये आतापर्यंत देशभरातील 543 पैकी 329 जागांचा निकाल समोर आला आहे. यामध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीला 181 जागा मिळणार असल्याचे सांगितले गेले आहे. एकूणच 2024च्या लोकसभा निवडणुकीतही या सर्व्हेनुसार सत्ताधारी एनडीए आघाडीच बाजी मारणार असून, मोदी सरकारच सत्तेवर येणार असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्राबाबत सांगायचं झालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी(NCP) काँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीचा भाजपला फायदा होणार असल्याचे सर्वेतून सांगण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून(BJP) यावेळी 400 पार जागा जिंकण्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्यासाठी पक्षाकडून प्रचार यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असून निवडणूकपूर्व वेगवेगळ्या मोहिमा हाती घेण्यात येत आहेत. नुकतेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी (24 फेब्रुवारी) रोजी नवी दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारींची बैठक घेतली आहे.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. तसेच प्रचारामध्ये सरकारची धोरणे, राम मंदिर, कलम 370 या मुद्द्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GYAN फॉर्म्युल्याचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT