Loksabha Elelction
Loksabha Elelction Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Phase 2 Elections Voting : राज्यात 49 हजार शस्त्रात्र जमा, 95 हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Sachin Deshpande

Maharashtra Phase 2 Elections : दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी (ता. 26) मतदान होणार आहे. यासाठी एकूण 16 हजार 589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.

यामध्ये इटीपीबीएसद्वारे 18,471 सेवा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, तर 12 डी अर्जाद्वारे 85 वर्षांवरील व दिव्यांग असे एकूण 14,612 मतदार मतदान करणार आहेत. या आठ मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) 37,403 तर कंट्रोल युनिट (सीयु) 16,589 आणि 16,589 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून, दुसऱ्या टप्प्यात एकूण 204 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली असून, त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी आठही लोकसभा मतदारसंघामध्ये सायलन्स पीरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदारसंघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार व्हाेटर स्लीप उपलब्ध करून दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 22 एप्रिलपर्यंत 49,134 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 1057 शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 95,250 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

43.96 कोटी रोख रक्कम जप्त

राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 43.96 कोटी एकूण रोख रक्कम तर 34.78 कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 88.37 कोटी रुपये, ड्रग्ज 216.47 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 87.84 कोटी रुपये अशा एकूण 471.89 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.16 मार्च ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 3,345 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 3,337 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच या कालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 26,815 तक्रारीपैकी 26,265 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

(Edited By Roshan More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT