Uddhav Thackeray Manifesto: ...अखेर ठाकरेंचा 'वचननामा' आला! शेतकऱ्यांसाठी 'ही' मोठी घोषणा

Loksabha Election 2024 : आमचं महाविकास आघाडीचं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम एक पोकळ इंजिन सरकार करतंय.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात प्रचार सभा, रॅली, भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोप यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचवेळी गुरुवारी (ता.25) शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेचे अचानक आयोजन करण्यात आले होते.

त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमकं ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं होतं. पण ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी वचननामा प्रसिद्ध केला आहे. यात शेतकरी वर्ग, उद्योगधंदे, आरोग्य व्यवस्था,जीएसटी करप्रणाली यांसंबंधी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननामा जाहीर केला. या वेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर तुफानी हल्ला चढवला. ते म्हणाले, 2014 मध्ये आम्ही युतीमध्ये होतो. घटक पक्ष म्हणून आम्ही तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलो होतो, तो क्षण आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. पण त्यावेळी स्वत: राष्ट्रपती आश्चर्यचकित होते. कारण बऱ्याच वर्षांनी देशात एका पक्षाची सत्ता आली होती.

ठाकरे म्हणाले, भाजपने त्यावेळी बहुमताच्या आकड्याला स्पर्श केला होता. त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली. पण 2019 मध्ये ते पुन्हा सत्तेत आले. त्यांनी कलम 370 काढलं,आम्ही तेव्हाही सोबत होतो. आता मात्र त्यांची पाशवी इच्छा समोर आली असून, त्यांना पाशवी बहुमत पाहिजे आहे. जेणेकरून ते देशाची घटनाच बदलून टाकतील, देशातील लोकशाही मारून टाकतील.ही त्यांची स्वप्नं उघड झाली आहेत, अशी टीकेची झोडही त्यांनी उठवली.

ही लूट इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर थांबवणार!

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,आमचं महाविकास आघाडीचं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम एक पोकळ इंजिन सरकार करतंय. त्याला साहजिकच केंद्राचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले जात आहेत.आधी हिरे व्यापार पळवले, त्यानंतर क्रिकेटचा सामना, फिल्मफेअर कार्यक्रम अशा सर्वच गोष्टी पळवल्या जात आहेत. महाराष्ट्राचं वैभव लुटलं जात आहे. पण ही लूट आम्ही इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर थांबवणार असल्याचा शब्द ठाकरेंनी या वेळी दिला.

मी सुरुवातीलाच जाहीर केलं होतं की,आवश्यक वाटलं तरंच आम्ही आमचा वचननामा प्रसिद्ध करू. पण आता शिवसेनेच्या वतीने वचननामा प्रसिद्ध करत आहोत. त्या वचननाम्याच्या सुरुवातीला मी उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलण्याची गरज नाही. मी शिवसेनेच्या वतीने जनतेला विनंती करतो की, आशीर्वाद असू द्या. मी वचननाम्यातील ठळक मुद्दे मांडू इच्छितो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरेंच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणा...

* शेतकऱ्यांना लागणारी खतं, बी-बियाणं जीएसटीमुक्त करणार

* शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार

* केंद्रात सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून अधिक वाढविण्यासाठी आग्रही राहणार.

पीकविम्याचे जाचक ठरणारे निकष काढून शेतकऱ्यांना अनुकूल निकष बनवणार.

देशात हुकूमशाही आणि एकाधिकारशाही संघराज्य पद्धती अधिक बळकट करू.

सध्या सुरू असलेल्या कर वसुली प्रणालीत सुधारणा करणार.

शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, जंतूनाशक औषधे, खते, औजारे इत्यादींवरील जीएसटी मुक्त करणार

शेती व शेतकरी हिताय पीकविमा योजनेचे पुनर्वलोकन आणि सुधारणा करणार.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच आर्थिक व अन्य मांगास घटकातील विद्याथ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणारी मदत वाढविण्यासाठी आम्ही आग्रही राहू

किमान ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील ५ वर्षे स्थिर ठेवणार.

गिफ्ट सिटी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची स्थापना स्थापन करणार.

महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात जाऊ नयेत, यासाठी इतर राज्यांपेक्षा चांगल्या उद्योगस्नेही योजना आणि सुविधा देणार.

महाराष्ट्रात उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी एक खिडकी योजना आणणार.

बेरोजगारी, शेतकरी, महिला, उद्योग या मूलभूत मुद्द्यांवर आम्ही काम करणार

संविधानाचं रक्षण करणं, हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी आम्ही काम करणार.

राज्यात आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Uddhav Thackeray
Sanjay Gaikwad News : 'तुपकर... तुझी 'शिकार' नक्की करणार; शिंदेंचे आमदार गायकवाडांचा इशारा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com