Maval Loksabha : ठाकरेंचा मावळा अडचणीत तेही मावळातच? दोन वाघेरे भिडणार...

Loksabha Election : मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे आहेत. ते मशाल चिन्हावर निवडणूक लढत आहेत.
Sanjog Waghere Patil
Sanjog Waghere Patilsarkarnama

Maval Political News : 'नावात काय आहे', असे शेक्सपिअरने म्हणून ठेवले आहे. शेक्सपिअर जर भारतात असता तर तो असे म्हटला नसता असे मेसेज व्हाॅट्सअॅपवर येत असतात. कारण नावातच नाहीतर नावामध्ये साधर्म्य असल्याचा फायदा घेतल्याची कित्येक उदाहरणे पाहण्यास मिळतील. राजकारणात तर नाम साधर्म्यामुळे अनेकदा मुख्य उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागतो. 'डमी' उमेदवारामुळे विरोधी उमेदवाराला पराभूत करण्याचा प्लॅनदेखील राजकीय पक्ष आखतात. तसाच काहीसा प्रकार मावळ मतदारसंघामध्ये Maval loksabha constituency घडत असल्याचे चित्र आहे.

Sanjog Waghere Patil
Ajit Pawar News : आढळरावांच्या मताधिक्याचा प्रश्न अन् अजितदादांचे थेट उत्तर !

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे Sanjog Waghere आहेत. ते मशाल चिन्हावर निवडणूक लढत आहेत. मात्र त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला नाशिकमधील संजय वाघेरे याने मावळ लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज संजय वाघेरे यांनी स्वतः भरला की त्यांना यासाठी कोणी प्रेरणा दिली, याची चर्चा आहे. उमेदवार नाशिकचा आहे तर तो तेथे अर्ज दाखल करू शकला असता. मात्र, त्याने मावळ मतदारसंघाची निवड केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

उमेदवारी अर्जाची छाननी आणि तो परत घेण्यास अजून काही कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे संजय वाघेरे आपला उमेदवारी अर्ज पात्र ठरणार की बाद होणार याचीदेखील काहीशी उत्सुकता असणार आहे. डमी उमेदवारामुळे फटका बसणार नाही, असा विश्वासदेखील ठाकरे गटातील शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुनील तटकरेंचा पराभव

सुनील तटकरे Sunil Tatkare हे 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या अनंत गितेंच्या विरोधात लढत होते. तटकरे यांचा अवघ्या 2110 मतांनी पराभव झाला, तर सुनील तटकरे नावाच्या अपक्ष उमेदवाराला 9852 मते मिळाली होती. त्यामुळे नाम साधर्म्याचा मोठा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना बसल्याचे दिसून आले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com