Lonavala tourist places : मुंबई, कोकणसह पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पर्यटकांचे खास आकर्षणाचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सध्याची स्थिती पाहता मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १६३ लागू केले आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लोणावळा ग्रामीण परिसरात भाजे धबधबा. लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईट, लायन्स पॉइंट पवना डॅम या ठिकाणी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात ता. ३१ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईट, लायन्स पॉईट, शिवलंग पॉईट, पवना डॅम अशी पर्यटनासाठी प्रसिध्द ठिकाणे आहेत. सध्या पावसाळा सिझन सुरु झालेला असून देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळा व परिसरात भेट देण्यासाठी येत आहेत.
वाहतुक कोंडी होवू नये या करीता पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण लोणावळा ग्रामीण यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यटनस्थळाकडे जाणा-या सर्व रस्त्याची पहाणी केलेली असून, शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवशी लोणावळा परिसरात बाहेरुन येणार पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी होवु नये. तसेच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी खालील ठिकाणी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार लागू होणेबाबत पोलीस अधिक्षकांनी कळविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
पवना डॅम परिसरामध्ये पर्यटक पर्यटनासाठी येत जात असतात पर्यटक हे डॅमचे पाण्यामध्ये उतरुन पाण्याचा अंदाज न आल्याने डॅममध्ये एकूण १५ पर्यटक बुडुन मयत झालेले आहेत. तसेच टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, पवना डॅम तसेच भाजे धबधबा येथे पर्यटक पर्यटनासाठी येत जात असतात. त्यावेळी चोरी व जबरी चोरीचे एकूण ४ गुन्हे दाखल झालेले आहेत. लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डोंगरावर गेलेले पर्यटक हे अचानक पऊस आल्याने त्यामध्ये वाहुन जावुन त्यात ६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहितीही आदेशात देण्यात आली आहे.
असे आहेत निर्बंध :
१) पावसामुळे वेगात वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
२) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
३) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्याचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरणे करणे.
४) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनधिकृत गद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.
५) वाहतुकीचे रस्ते, तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
६) वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा वेगाने चालवणे.
७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
८) सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे.
९) सार्वजनिक ठिकाणी येणा-या महिलांशी छेडछाड करणे.
१०) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टीम वाजविणे, गाडीतील स्पिकर्स/उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे.
११) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती न करणे.
१२) धबधबे, धरणे व नदी आदीच्या परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करणेत मनाई करणेत येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.