MVA Sarkarnama
महाराष्ट्र

Congress Politics: मोठी बातमी: महाविकास आघाडीला पहिला धक्का; काँग्रेस लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mahavikas Aaghadi : महायुती किंवा महाविकास आघाडीकडून अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठीचे पत्ते उलगडण्यात आलेले नाहीत. राज्य पातळीवर प्रमुख युती आणि आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असल्याचं सांगत वेगळ्या निर्णयांची शक्यता वर्तवली आहे.

Deepak Kulkarni

थोडक्यात बातमी:

1.महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून सर्वच पक्ष आघाडी–युतीबाबत हालचाली करत आहेत.

2.महाविकास आघाडीत फुट पडण्याची शक्यता असून धाराशिवमध्ये काँग्रेसने स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय संकेत दिला आहे.

3. उमरगा येथील काँग्रेसच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी "एकला चलो रे"चा पवित्रा घेतल्याने राज्यभरात आघाडीतील इतर पक्षही स्वतंत्र लढतीचे निर्णय घेऊ शकतात.

Dharashiv News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. याच धर्तीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी आणि युतीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातच आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही युतीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसही (Congress) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

महायुती किंवा महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठीचे पत्ते उलगडण्यात आलेले नाहीत. राज्य पातळीवर प्रमुख युती आणि आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असल्याचं सांगत वेगळ्या निर्णयांची शक्यता वर्तवली आहे.

पण आता स्थानिकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला फुटीचा पहिला धक्का मराठवाड्यात बसण्याची शक्यता आहे. कारण आता धाराशिव जिल्ह्यातून मोठी अपडेट समोर येत आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वबळाची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

तर धाराशिवमध्ये आता काँग्रेसनेही यावेळची स्थानिकच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा पवित्रा घेत नवा राजकीय बॉम्ब टाकला आहे. जिल्हा काँग्रेसच्या उमरगा येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत.

काँग्रेसकडून स्थानिकच्या निवडणुकांची तयारी आणि रणनीती आखण्यासाठी या जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वानं याच बैठकीत 'एकला चलो रे'चे संकेत दिले आहेत. धाराशिवनंतर राज्यभरातही सोयीनुसार महाविकास आघाडीतील घटक पक्ष मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढायचे की आघाडीत? याचा सर्वस्वी निर्णय हा स्थानिक परिस्थिती पाहून तिथल्याच नेत्यांनी घ्यायचा आहे, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच आघाडी संदर्भात राज्य पातळीवर कुठलाच निर्णय घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आघाडी संदर्भात कुठलाही निर्णय हा राज्य पातळीवरून होणार नाही, याचे सर्व अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Q1. महाराष्ट्रात सध्या कोणत्या निवडणुकांची तयारी सुरू आहे?
➡️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.

Q2. महाविकास आघाडीत फुटीची चर्चा का सुरू आहे?
➡️ धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा संकेत दिल्यामुळे.

Q3. काँग्रेसने कोणत्या बैठकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले?
➡️ उमरगा येथील जिल्हास्तरीय काँग्रेस बैठकीत.

Q4. पुढे राज्यभरात काय होऊ शकते?
➡️ घटक पक्ष आपल्या सोयीनुसार स्वतंत्र लढतीचे निर्णय घेऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT