Mahadev Jankar Sarkarnama
महाराष्ट्र

Mahadev Jankar News : महादेव जानकरांचं ठरलं! ; महायुतीला सोडचिठ्ठी, विधानसभा स्वबळावरच लढवणार

Rashtriya Samaj Party News : राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार उभा करणार असल्याचं जानकरांनी म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Rashtriya Samaj Party and Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा मित्र पक्ष असणारा महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणवार आहे. विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार रासपचे उमेदवार उभा केले जाणार आहेत. महादेव जानकर यांनी ही घोषणा केली आहे.

आज सकाळी महायुतीची पत्रकारपरिषद झाली, यावेळी भाजप, शिवसेना(Shivsena), राष्ट्रवादी, आरपीआयचे रामदास आठवले आणि सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती.मात्र महादेव जानकर यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे तेव्हाच यावर शिक्कामोर्तब झाल्याच बोललं जात होतं. अखेर महादेव जानकरांनी निर्णय घेतला.

जागा वाटपात रासपचा योग्य प्रमाणात विचार केला गेला नसल्याचा जानकरांचा आरोप असल्याचीही माहिती समोर येत आहे., महादेव जानकरांनी(Mahadev Jankar) महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एक ते दोन दिवसांत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे.

अशाप्रकारे एकीकडे कालच निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले गेल्यानंतर, आज म्हणजेच त्याच्या दुसऱ्याच दिवशी रासपने हा निर्णय घेत महायुतीला धक्का दिला आहे.

मी कुणावर नाराज नाही - जानकर

एका वृत्तवाहिनीस दिलेल्या प्रतिक्रियेत महादेव जानकर म्हणाले, 'मी कुणावर नाराज नाही. राष्ट्रीय समाज पक्ष देखील या देशात मोठा पक्ष झाला पाहीजे. काँग्रेस आणि भाजपच्या(BJP) लायकीत आला पाहीजे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. आमची ताकद किती आहे, ते आम्ही पाहणार आहोत, आजमावणार आहोत. आम्ही सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार आहोत. मी महायुतीबरोबर होतो, आता महायुतीबरोबर नाही. त्यांच्याबरोबर होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला लोकसभेची एक जागा दिली होती, अभिनंदन. आता आमची आम्हाला ताकद बघायची आहे.'

आमच्या चौकात आमची औकात आम्हाला बघायची आहे -

'आमच्या पक्षाला मान्यता मिळण्यासाठी आम्हाला कमीतकमी 12 आमदार आणि दोन खासदार होणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाच्या अटींची पूर्तता करण्यासाठी आम्हाला आमचे दहा-पंधरा आमदार निवडून आणले पाहीजे, आता सध्या खासदार नाहीत. परंतु त्यामुळे आम्ही आमच्या संसदीय समितीने निर्णय घेतला की आपण स्वतंत्रपणे 288 जागा लढवल्या पाहीजेत. एवढंच नाहीतर झारखंडमध्ये सुद्धा आमचा राष्ट्रीय समाज पक्ष जागा लढवत आहे. आम्ही कुणावरही नाराज नाही. महायुतीवरही नाही आणि महाविकास आघाडीवर देखील नाराज नाही. आमच्या चौकात आमची औकात आम्हाला बघायची आहे. त्यासाठी या दोघांना समान अंतरावर ठेवून राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार. आता आणखी काही दुसरा विचारच होवू शकत नाही.' अशा शब्दांमध्ये जानकरांनी प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT