Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Ganesh Naik Voting Issue: टांगा पलटी केला म्हणणाऱ्या सत्ताधारी मंत्र्यांचे मतदान केंद्रच केले फरार; उद्धव ठाकरेंनी भर निवडणुकीत सरकारला उघडे पाडले

Maharashtra Municipal Election News : उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या यंत्रणेवर अनेक गंभीर आरोप करीत भर निवडणुकीत सरकारला उघडे पाडले.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. राज्यभरात सकाळपासूनच उत्साहात मतदान केले जात आहे. त्यातच मतदान करीत असताना मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार मुंबईत उघड झाला आहे. त्यामुळे ऐन मतदानादिवशीच पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जास्त असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता गुरुवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या यंत्रणेवर अनेक गंभीर आरोप करीत भर निवडणुकीत सरकारला उघडे पाडले.

राज्यातील मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधण्यास वेळ लागत आहे. काही जणांचे नाव दुसऱ्याच मतदान केंद्रावर आल्याचे पुढे आले आहे. त्यातच काही दिवसापूर्वी नवी मुंबईतील भाजप नेते व वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी टांगा पलटी केल्याचे सांगितले होते. त्याच गणेश नाईक यांना निवडणूक केंद्र शोधण्यासाठी चार तास लागले. त्यांना तंगडतोड करावी लागली. टांगा फरार करणाऱ्या नाईकांचेच मतदान केंद्र फरार झाले. गणेश नाईकांना मतदान केंद्र शोधण्यासाठी चार तास लागले. या सर्वच गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात निवडणूक आयोगाला अपयश आले आहे. त्यामुळे निवडणूक आयुक्तांना निलंबित करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

गुरुवारी सकाळी मतदानाचा हक्क बजवाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री परिसरातच पत्रकार परिषद घेतली. या यावेळी उद्धव ठाकरेंनी मतदानादरम्यान बोटावर खूण करण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीवर भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी यावेळी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. गेल्या चार वर्षांनंतर निवडणुका होत आहेत, तरीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. शाई पुसली जाण्याचे प्रकार समोर येत आहेत, यावरून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर त्यांनी शंका उपस्थित केली.

या पत्रकार परिषदेवेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या यंत्रणेच्या कारभारावर सडकून टीका केली. निवडणूक आयुक्त हे मुख्यमंत्र्यांचे घरगडी म्हणून काम करत आहेत की काय? अशी विचारणा करत उद्धव ठाकरेंनी आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी केलेल्या या टीकेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयुक्त लाचारी करत आहेत, अशी सणसणीत चपराकही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावली.

दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा हा कारभार चव्हाटयावर आल्यानंतर सडकून टीका केली. सरकारने महापालिका निवडणुका जिंकायचे ठरविले आहे. जे विधानसभेला केले ते आता करत आहे पण आम्ही होऊ देणार नाही. आजपर्यंत शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण करण्यात येत आहे. सॅनिटाईजरने ही खूण पुसली जातेय. फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणे, याला निवडणुका म्हणत नाही, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT