BJP vs Shivsena : शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; मतदानाच्या आदल्यादिवशी भाजप-शिवसेनेत राडा

Dhule municipal election Political Clash : धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन देवपूर भागात ही पत्रके वाटली जात असल्याचा आरोप करण्यात आला. आरोपानंतर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्यावर भाजपने आरोप केले. यांचे पुतणे आणि उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या समर्थकांनी पत्रक वाटल्याचा आरोप होता.
EKnath shinde, Devendra Fadnavis
EKnath shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Dhule News, 15 Jan : धुळे महापालिका निवडणुकीत गेले आठवडाभरापासून सतत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचे प्रकारही घडलेत. त्या पार्श्वभूमीवर काल शहरात उमेदवारांच्या समर्थकांमध्ये नवा वाद उभा राहिला.

मतदानाच्या आदल्या दिवशी काल दुपारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भारती पवार यांच्या विरोधात बदनामीकारक पत्रके वाटली जात असल्याचे समजले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही पत्रके वाटणाऱ्या लोकांना प्रतिबंध केला.

धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन देवपूर भागात ही पत्रके वाटली जात असल्याचा आरोप करण्यात आला. आरोपानंतर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्यावर भाजपने आरोप केले. यांचे पुतणे आणि उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या समर्थकांनी पत्रक वाटल्याचा आरोप होता.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Baramati Election: बारामतीत राष्ट्रवादीकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग; नेमका काय झाला फायदा?

त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार पाटील यांच्या घरावर दगडफेक केली. तेथील वाहनांची नासधूस केली. अचानक झालेले या प्रकाराने देवपूर भागात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यावर आमदार मंजुळा गावित या आपल्या समर्थकांसह घटनास्थळी आल्या. त्यांच्यासमवेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विविध पदाधिकारी देखील होते. निवडणूक प्रचाराच्या सांगते नंतर झालेल्या या प्रकाराने त्यांनी संताप व्यक्त केला.

भाजपच्या उमेदवाराच्या समर्थकांकडून गुंडगिरी केली जात आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हे प्रकार घडत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर शिवसेनेच्या नेते आणि आमदार गावित यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर भाजपनेही शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधात बदामी कार्य पत्रक वाटल्याची तक्रार केली.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Nashik Municipal Election : 'तुला गायबच करतो...' विरोधात प्रचार केला म्हणून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची बांधकाम कंत्राटदाराला धमकी, थेट घरात घुसून धक्काबुक्की

या प्रकाराने मतदानाच्या आदल्या दिवशी देवपूर परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या नेत्यांना आणि उमेदवारांना समज दिली. तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करीत सगळ्यांना शांततेचे आवाहन केले.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटात झालेल्या या हाणामारीने रात्रभर प्रभाग दोन मध्ये तणावाची स्थिती होती. या पार्श्वभूमीवर आज मतदान होत आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रभाग दोनच्या मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. मतदानाच्या एक दिवस आधी भाजप आणि शिवसेनेत झालेल्या दगडफेक आणि वादाने मतदानावर काय परिणाम होतो याचे उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com