Adani Private Ltd demands major compensation after Maharashtra shuts 22 border checkposts. Sarkarnama
महाराष्ट्र

Adani Group : अदानी ग्रुपची फडणवीस सरकारकडे 7 हजार कोटींची मागणी; पै न् पै वसूल करण्यावर ठाम!

Adani Group : महाराष्ट्रातील २२ सीमानाके बंद केल्यानंतर आदानी कंपनीने ७५०० कोटी नुकसानभरपाईची मागणी केली. विधी विभागाच्या सल्ल्यानुसार परिवहन विभाग इतकी रक्कम देण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.

महेश जगताप

Adani Group : कालबाह्य ठरलेले व वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणारे राज्यातील सर्व 22 सीमानाके बंद करण्याचा निर्णय परिवहन विभागाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. यानंतर अदानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने परिवहन विभागाकडे नुकसानभरपाई म्हणून साडेसात हजार कोटींची मागणी केली होती.

यावर परिवहन विभागाने कायदेशीर सल्लागार नेमून विधी विभागाचा सल्ला घेण्याचे ठरवले होते. आता विधी विभागाच्या सल्ल्यानुसार परिवहन विभाग इतकी मोठी रक्कम देण्यास राजी नसल्याचे समजते. पण कंपनी मात्र साडेसात हजार कोटींच्या मागणीवर ठाम असल्याचीही माहिती आहे.

कालबाह्य ठरलेले व वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणारे 22 सीमानाके बंद करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला होता. मात्र २०२१ मध्ये सद्‌भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लि. या कंपनीकडून १, ६८० कोटी रुपयांमध्ये राज्यातील दिवसाला एक कोटी साठ लाख रुपयांचे उत्पन्न देणारे २२ सीमा नाके अदानी रोड ट्रान्सपोर्ट लि. या कंपनीने ताब्यात घेतली होती.

मात्र परिवहन विभागाने राज्यातील सर्व सीमा नाके बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदानींच्या कंपनीने परिवहन विभागाकडे भरपाई म्हणून साडेसात हजार कोटींची मागणी केली होती. सल्ला घेण्याचे ठरवले होते. यासंदर्भात परिवहन आयुक्त विवेक भिमनवार व मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

याबाबत बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले, हे प्रकरण गेल्या महिन्यात अंदाज समिती समोर आले होते. मात्र यावर हे प्रकरण विधी विभागाकडे ठेवले असल्याचे सांगण्यात आले. अदानींच्या कंपनीला साडेसात हजार कोटी देण्यास आम्ही पूर्ण विरोध केला आहे. हे प्रकरण अंदाज समिती समोर मांडण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT