Shivsena News : महायुतीचा जागावाटपासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी फाॅम्युला निश्चित करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला फक्त 70 जागा येणार आहेत. मात्र, 70 जागा घेण्यास एकनाथ शिंदे तयार नसून आपल्याला 100 जागा मिळाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. यासाठी ते दिल्लीत जात अमित शाह यांच्या चर्चा करणार असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.
महायुतीमध्ये भाजप 160 जागा लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या वाट्याला 70 जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा एकच खासदार विजयी झाला. तर, कमी जागा लढवून देखील एकनाथ शिंदे यांचे सात खासदार विजयी झाले. सर्वाधिका जागा लढवून देखील भाजपचे केवळ 9 खासदार विजयी झाले. भाजपला लोकसभेला मोठा फटका बसला.
शिवसेना (शिंदे गट) नेत्यांकडून आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त होता. त्यानुसार आम्हाला विधानसभेला 120 जागा मिळाल्या पाहिजे, असा दावा केला जात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्टाईक रेट आणि जिंकण्याची क्षमता यावर जागावाटप होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेला 100 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता होती. मात्र, भाजपच्या फाॅर्म्युल्यानुसार एकनाथ शिंदेंच्या वाट्याला फक्त 70 जागा येत आहेत.
महायुतीमध्ये अमित शाह यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 40 जागा देण्याचा फाॅर्म्युला ठेवला आहे. मात्र, काँग्रेसमधील काही आमदार राष्ट्रवादी येणार असल्याचा दावा करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 60 ते 65 जागांची मागणी करण्यात येत असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.