sanjay raut | nana patole sarkarnama
महाराष्ट्र

MVA Politics : मविआच्या जागावाटपाचा वाद विकोपाला, ठाकरे गटाने घेतली मोठी भूमिका; 'नाना पटोले बैठकीला असतील तर...'

Maharashtra assembly election Shivsena Congress Nana Patole : नाना पटोले ज्या बैठकीत असतील त्या बैठकीला शिवसेनेचे (यूबीटी) सदस्य उपस्थित राहणार नाही, अशी टोकाची भूमिका शिवसेने (यूबीटी)कडून घेण्यात आली आहे.

Roshan More

MVA Politics : नाना पटोले यांची जागावाटपामध्ये आग्रही भूमिका घेत आहेत. त्यामुळे शिवसेना (यूबीटी) नाराज आहेत. नाना पटोले ज्या बैठकीत असतील त्या बैठकीला शिवसेनेचे (यूबीटी) सदस्य उपस्थित राहणार नाही, अशी टोकाची भूमिका शिवसेने (यूबीटी)कडून घेण्यात आली आहे. याविषयी वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी काँग्रेसमुळे मविआतील जागावाटप अडलं आहे. काँग्रेसने जागावाटपाचा निर्णय राज्यात घेतल्यास लवकर जागावाटप होईल, असा म्हटले. तर, त्यांचे नेते राज्यात आहेत आमचे दिल्लीत आहेत, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले.

महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी बैठका होत आहेत. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.मात्र, नाना पटोले यांच्या काही जागांच्या बाबत आग्रही भूमिकेमुळे शिवसेनेचे नेते नाराज असल्याची माहिती आहे.त्यामुळे पटोले जर बैठकीत असतील तर आम्ही बैठकीला येणार नाही, अशी भूमिका शिवसेना (यूबीटी) नेत्यांनी घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या दिल्लीतील नेते या नाराजीची दखल घेत तोडगा काढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाद होतील पण निकाल...

महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, आमचे सर्व नेते सर्व उमेदवार निश्चित करतील. लोकसभा तिकीटवाटपाच्या वेळी देखील थोडीशी चर्चा काही प्रमाणात वाद झाले होते. मात्र, अंतिम निकाल वेगळा आला. लोकसभेप्रमाणेच विधानसभेचा निकाल तुम्हाला दिसतील. लोकसभेप्रमाणे विधानसभेला महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT