Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : ‘बटेंगे तो कटेंगे’वरून फडणवीस अन् अजितदादा आमनेसामने; काय म्हणाले?

Devendra Fadnavis Vs Ajit Pawar: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला जात आहे.

Rajanand More

Mumbai News: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी ‘बटेंगे तो कटेंगे’ यावरून राजकारण तापले आहे. विरोधकांकडून या घोषणेला विरोध असतानाच भाजपमध्येही दोन मतप्रवाह आहेत. आता राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावरून टोकाची वेगवेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे महायुतीतील नेतेच आता आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रचारसभांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला जात आहे. याचे समर्थन करताना फडणवीस म्हणाले, यामध्ये मला चुकीचे काही वाटत नाही. या देशाचा इतिहास पाहा. जेव्हा-जेव्हा विखुरले गेलो, तेव्हा गुलाम बनलो. जात, राज्य, समाजामध्ये जेव्हा आपला देश विभागला तेव्हा गुलाम बनलो. त्यामुळे आपण जर विभागलो गेलो तर तुकडे पडतील. हा देशाचा इतिहास आहे.

अनेक दशके अजित पवार हे हिंदूविरोधी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेसोबत होते. स्वत: धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्यांमध्ये खरी धर्मनिरपेक्षता नाही. हिंदूत्वाला विरोध करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या लोकांसाबोत ते होते. लोकांचा मूड काय आहे, हे समजायला अजित पवारांना काही वेळ लागेल. ते लोक (महाविकास आघाडी) जनतेच्या भावना समजून घेऊ शकत नाही किंवा त्यांना वक्तव्य समजलेले नाही किंवा त्यांना वेगळे काही म्हणायचे असावे, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी यापूर्वीही प्रचारसभांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’च्या विरोधात सूर आळवला होता. गुरूवारी पुन्हा एकदा ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, भाजपच्या काही नेत्यांनीही या घोषणेचा विरोध केला आहे. सबका साथ सबका विकास म्हणजे सगळ्यांच्या साथीने विकास, असे सांगताना अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्याचे समर्थन केले. 

योगींच्या घोषणेनंतर आम्ही लगेच सांगितले की हे उत्तर प्रदेश नाही. हे उत्तर प्रदेशात चालू शकते, महाराष्ट्रात नाही, असेही अजितदांनी म्हटले आहे. दरम्यान, योगींच्या विधानावर भाजप नेत्या पंकजा मुंडे, अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर भाजपमध्येच दोन मतप्रवाह असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT