Ajit Pawar : उद्योगपतींचे ऐकून कोण मुख्यमंत्री बनले? अजित पवारांनी विरोधकांना घेरलं

Ajit Pawar criticizes opposition over CM selection and industrialists: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे सरकार गौतम अदानींनी विकत घेतल्याची टीका गुरूवारी केली होती.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तास्थापनेबाबत उद्योगपती गौतम अदानींसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही यावरून टीका केली आहे. राज्यात काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, प्रत्येकाने उद्यागपतींसोबत काम केले. मग कोणते मुख्यमंत्री उद्योगपतींचे ऐकून बनविण्यात आले, असा सवाल पवारांनी केला.

अजित पवारांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर शरसंधान साधले. गौतम अदानींच्या इशाऱ्यावर महायुतीचे सरकार चालत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्याला उत्तर देताना अजितदादा म्हणाले, हे 101 टक्के चुकीचे आहे. महाराष्ट्रात असे होत नाही. महाराष्ट्रात खूप मोठे उद्योग आहे. ते त्यांचे काम स्वतंत्रपणे करतात. निवडणुकीमुळे विरोधक असे आरोप करत आहेत.

Ajit Pawar
Devendra Fadnavis VIDEO : शरद पवार हे भीष्म पितामह! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री बनले त्यामध्ये एक शिवसेनेचे आणि केवळ पाच वर्षे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. उध्दव ठाकरेही शिवसेनेचे होते. त्यानंतर उरलेले सर्व मुख्यमंत्री काँग्रेसचे आहेत. प्रत्येकाने त्यांच्यासोबत (उद्योगपती) काम केले. मग कोणते मुख्यमंत्री उद्योपतींचे ऐकून करण्यात आले? त्यांनी सांगावं, असा पलटवार अजित पवारांनी केला.

नवाब मलिकांचे पुन्हा समर्थन

अजित पवारांनी पुन्हा एकदा नवाब मलिकांचे समर्थन केले. ते म्हणाले, नबाव मलिकांवर कऱण्यात आलेले आरोप सिध्द झालेले नाही, मग त्यांना तिकीट का देऊ नये? राजीव गांधी यांच्यावर बोफोर्ससारखे अनेक आरोप झाले. पण याचा अर्थ ते आरोपी आहेत, असा होत नाही. ही लोकशाही आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्यावर आपण आरोप करू शकत नाही. 

Ajit Pawar
Sanjay Raut : '26 तारखेनंतर मोदी सत्तेत नसतील'; संजय राऊतांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसने काही दिले नाही

काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती, पण त्यांनी काहीच दिले नाही, अशी टीकाही अजित पवारांनी केली. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेचा काँग्रेसने कधी विचार केला नाही. आता ते देण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड आम्हाला माहिती आहे. 2003 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मोफत वीजेचे दिलेले आश्वासन विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर मागे घेतले. काँग्रेस असेच काम करते, असा टोलाही पवारांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com