Devendra Fadnavis VIDEO : शरद पवार हे भीष्म पितामह! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Sharad Pawar Maharashtra Assembly Election Mahayuti Mahavikas Aghadi : देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दोन पक्षांमध्ये पडलेल्या फुटीवर शरद पवार यांच्याकडे बोट दाखवले आहे.
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राजकीय पक्ष आणि कुटुंब फोडण्यात ते भीष्म पिता पितामह असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. अति महत्वाकांक्षेमुळे राज्यातील दोन पक्ष फुटल्याचेही त्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांवर टीका केली. महाराष्ट्रातील निवडणुकीवर कुटुंब आणि पक्षफुटीचा काय परिणाम होईल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, कसलाही परिणाम होणार नाही. कुटुंब आणि पक्ष फोडण्यात, त्यांना एकत्रित करण्यात पुन्हा फोडण्यात महाराष्ट्रात कुणी महारथी असेल तर ते शरद पवार. 1978 पासून त्यांनी किती पक्ष आणि कुटुंब फोडली याची यादी केली तर त्यांना यामधील भीष्म पितामह म्हणावे लागेल.  

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Rahul Gandhi Politics: बालेकिल्ल्यात राहुल गांधी गरजले, मोदींना आव्हान देत आदिवासींना जिंकले!

अति महत्वाकांक्षेमुळे शिवसेना फुटल्याचा दावा करताना फडणवीस म्हणाले, उध्दवजींना मुख्यमंत्री व्हायचे असल्याने त्यांनी आमच्यासोबतची युती तोडी. मख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना आदित्य ठाकरेंना पुढे आणायचे होते. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी केली. त्यामुळे शिंदेंकडे काहीच पर्याच नव्हता. दुसरीकडे पक्षात 30 वर्षे नेतृत्व करत असलेल्या अजित पवारांना शरद पवारांनी व्हिलन बनवलं. त्यामुळे त्यांच्याकडेही पर्याच नव्हता.

काँग्रेसच्या ट्रोल आर्मीकडून पत्नीवर निशाणा

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी एका सभेत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. मागील पाच वर्षात कन्हैया कुमाराला माझ्या विरोधात काही करता आले नाही. त्याने माझ्यावर व्यक्तिगत टीका केली आणि आता त्याची ट्रोल आर्मी माझ्या पत्नीवर इन्स्टाग्राम रील्सवरून आरोप करत आहे. मी माझ्या पत्नी सांगितले आहे की, आपण राजकारणात असून संयमी असायला हवे. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं’.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : "सत्तास्थापनेच्या बैठकीला अदानी नव्हतेच पण शरद पवारांसोबत..." अजित पवारांनंतर फडणवीसांचा गौप्यस्फोट

हे धर्मयुध्द!

देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक म्हणजे धर्मयुध्द असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीचे लोक असत्यासाठी आणि आम्ही सत्यासाठी लढत आहोत. मतांसाठी या लोकांनी समाजाला तोडले. त्यामुळे आम्ही जेव्हा निवडणुकीत लढतो, त्यावेळी कोणतेही शस्त्र किंवा मिसाईल नसते. विरोधकांनी चुकीच्या गोष्टी गेल्या तर त्याला आम्ही उत्तर देऊ. ‘ईंट का जवाब पत्थर से.’ आमच्यासमोर लोक जर आमच्यावर हल्ला करत असतील तर आम्ही ते पाहत बसणार नाही. अशा अहिंसेवर आमचा विश्वास नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com