BJP Candidate List Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Candidate List : विद्यमान आमदार, महिला उमेदवार, नातेवाईकांना तिकीटं… ही आहेत भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये

Maharashtra Assembly Election BJP Politics : भाजपने 99 जागांवर उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. या यादीमध्ये 80 विद्यमान आमदार आहेत.

Rajanand More

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विद्यमान आमदारांचाच भरणा असून महिला उमेदवारही लक्षणीय आहेत. त्याचप्रमाणे अनेक नेत्यांच्या नातेवाईकांनाही तिकीट देत भाजपनेही घराणेशाहीचा डंका वाजवला आहे.

भाजपच्या पहिल्या यादीमध्ये पहिलेच नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते कामठी मतदारसंघाचे उमेदवार असतील. त्यांच्यासाठी विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

पहिल्या यादीमध्ये 99 पैकी तब्बल 80 विद्यमान आमदार आहेत. फडणवीसांसह चंद्रकांत आशिष शेलार, राहुल नार्वेकर, जयकुमार रावल, गिरीश महाजन, संजय कुटे, सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, अतुल सावे, प्रशांत बंब, गणेश नाईक, मंगल प्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, राणाजगजीतसिंह पाटील, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे आदी नेत्यांचा समावेश आहे.

महिलांना संधी

भाजपने पहिल्या यादी 13 महिला उमेदवारांची उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामध्ये मंदा म्हात्रे, श्वेता महाले, प्रतिमा पाचपुते, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, विद्या ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, मनीषा चौधरी, सुलभा गायकवाड, सीमा हिरे, अनुराधा चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांचा समावेश आहे.

अशी ही घराणेशाही

आशिष शेलार (वांद्रे पश्चिम ) आणि त्यांचे बंधू विनोद शेलार (मालाड पश्चिम) या दोन्ही बंधूंना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया, चिंचवडमध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे, प्रकाश आवाडेंचे पुत्र राहुल आवाडे, नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे, धनंजय महाडिंकाचे चुलत बंधू अमल महाडिक, अनिल शिरोळेंचे पुत्र सिध्दार्थ शिरोळे, गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते ही काही प्रमुख नावे सांगता येतील.

यादीची काही प्रमुख वैशिष्ट्ये –

-    80 विद्यमान आमदारांना संधी

-    13 महिला उमेदवार

-    2019 मध्ये तिकीट कापलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट

-    अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया यांना उमेदवारी

-    पोलिस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी

-    विनोद अग्रवाल आणि महेश बालदी या 2 अपक्ष आमदारांना भाजपचे तिकीट

-    अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या मुलाला भाजपचे तिकीट

-    विधान परिषदेचे आमदार राम शिंदेंना उमेदवारी

-    आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी जाहीर

-    बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघात प्रवीण तायडे भाजपचे उमेदवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT