BJP Candidates List : कोल्हापुरात अमल महाडिक, राहुल आवाडेंना उमेदवारी; सांगलीत पुन्हा गाडगीळ, खाडेंवर भरवसा

Kolhapur Sangli Assembly Election Ichalkaranji Miraj Assembly : भाजपने पहिली उमेदवारी जाहीर केली असून त्यामध्ये विद्यमान आमदारांचाच भरणा आहे.
Amal Mahadik, Suresh Khade, Sudhir Gadgil, Rahul Avade
Amal Mahadik, Suresh Khade, Sudhir Gadgil, Rahul AvadeSarkarnama
Published on
Updated on

Amal Mahadik, Rahul Avade News : महायुती आणि महाविकास आघाडी संदर्भात जागा वाटपाबद्दल सुरू असलेल्या चर्चेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आज भाजपची पहिली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यावर काहीसा पडदा पडणार आहे.

उमेदवारी यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Amal Mahadik, Suresh Khade, Sudhir Gadgil, Rahul Avade
Vidhansabha Election 2024 : भाजपची पहिली यादी : मराठवाड्यात दोन नव्या चेहऱ्यांना संधी, तर विद्यमान सगळे आमदार पुन्हा रिंगणात!

सांगली विधानसभा मतदारसंघात आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली होती. मात्र पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा सुधीर गाडगीळ यांनाच संधी देण्यात आली आहे. तर मिरज विधानसभा मतदारसंघातून मंत्री सुरेश खाडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

कोल्हापूर दक्षिण विधान मतदार संघातील भाजपकडून अमल महाडिक विरुद्ध काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ऋतुराज पाटील असा सामना होणार आहे. 2014 च्या विधानसभा मतदारसंघात अमल महाडिक यांनी अवघ्या पंधरा दिवसांत प्रचारात जोर लावत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांचा पराभव करत विधानसभेवर एन्ट्री केली होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांचा पराभव करत सतेज पाटलांच्या पराभवाचा वाचपा काढला होता.

Amal Mahadik, Suresh Khade, Sudhir Gadgil, Rahul Avade
BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीत इतक्या महिला उमेदवारांना संधी; चार नवे चेहरे

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांनी महिनाभरापूर्वी पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा ताराराणी पक्षाकडून केली होती. मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नुकताच आवाडे यांनी भाजप प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.

आज पहिल्या यादीत राहुल आवारे यांचं नाव घोषित करण्यात आला आहे. महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून मदन कारंडे यांच्याकडे पाहिले जाते. राहुल आवाडे हे लोकसभा निवडणुकीसाठी देखील इच्छुक होते. त्यासाठी उमेदवारीची मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

कोल्हापूर दक्षिण मध्ये पुन्हा एकदा अमल विरुद्ध ऋतूराज अशी लढाई होणार आहे. 2009 साली 'हाय व्होल्टेज' लढतीत धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्या लढाईत पाटील यांचा 5,767 मतांनी विजय झाला होता. तर 2014 ला भाजपकडून धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक यांनी भेट सतेज पाटील यांना 8,528 मतांनी पराभवाचा धक्का दिला.

2019 ला सतेज पाटील यांनी आपले पुतणे ऋतुराज यांना मैदानात उतरवून तब्बल 42 हजार 709 मतांनी अमल यांना पराभूत करुन पराभवाचा वचपा काढला होता. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून महाडिक विरुद्ध पाटील असाच सामना रंगला आहे. आतापर्यंत पाटील गटांनी दोन वेळा विजय मिळवला आहे तर महाडिक गटाने एक वेळा विजय मिळवला आहे. 2024 च्या लढाईत महाडिक गट बाजी मारणार की पाटील गट बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com