Mumbai News: काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी हा केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे प्रियंका महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार की नाही, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, प्रियंका या कोल्हापूरचा दौरा करत प्रचारसभा घेणार असल्याची माहिती आहे.
प्रियंका गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याचे नियोजन सुरू असून पक्षाचे प्रभारी कन्हैयाकुमार हे 13 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये येणार असून प्रियंका या 16 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्या कोल्हापूर शहरात रोड शो तसेच गांधी मैदानात जाहीर सभा देखील घेणार असल्याची माहिती आहे.
कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघातील उमेदवारांसह करवीर मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रियंका गांधी प्रचार करणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसची करवीरमधील उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ आज (ता. 11) लातूरचे आमदार अमित देशमुख कोल्हापुरात येत आहेत. देशमुख यांच्या उपस्थितीत असळज (ता. गगनबावडा) येथे प्रचार सभा होणार आहे. त्यानंतर ते सांगली दौऱ्यावर जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ हे 17 नोव्हेंबरला सभा घेणार आहेत. या सभेला भाजपचे राज्यस्तरीय नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसने पुरस्कृत केलेले उमेदवार राजेश लाटकर यांच्यासाठी माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे या सक्रिय झाल्या आहेत. आपल्या समर्थकांची बैठक घेत प्रचारात ते सक्रिय होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या बैठकीला काँग्रेस नेते सतेज पाटील हे देखील उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.