Shrirampur Assembly Constituency: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठरलेली प्रचारसभा रद्द झाल्याने त्यांच्या उमेदवाराचे ब्लडप्रेशर वाढले. या उमेदवाराला थेट हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट करावे लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी प्रचारसभा घेणार होते. मात्र, त्यांची प्रचारसभा रद्द झाली. मुख्यमंत्री यांची सभा का रद्द झाली याचे कारण समोर आले नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाल्याचा धसका उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी घेतला. भाऊसाहेब कांबळे यांचे ब्लडप्रेशर वाढल्याने त्यांना थेट हाॅस्टिपटलमध्ये दाखल करावे लागले.
भाऊसाहेब कांबळे महायुतीमधील नेत्यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले मला उमेदवारी दाखल करण्यास सांगणारे हेच लोक आणि उमेदवारी मागे घ्यायला लावणारे पण हेच आहेत. पक्षाने मला एबी फाॅर्म दिला त्यामुळे मी धनुष्यबाण चिन्हावर लढतो आहे. सामान्य जनता माझ्यासोबत आहे. माझ्या नेत्याने जर सांगितले असते तर मी माघार घेतली असती मी निवडणूक लढणारच
श्रीरामपूर मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब कांबळे उमेदवार आहेत. तर, याच मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीमधी दोन उमेदवार समोरासमोर आहेत. दोन्ही उमेदवारांकडून आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला जातो आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांची श्रीरामपूरमधील प्रचार सभा रद्द झाली. त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुरंदरमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवाराच्या प्रचारासाठी जाऊ शकले नाही. त्यांना प्रचारसभा रद्द करत अचानक मुंबईला जावे लागले. पुरंदरमतदारसंघात देखील महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विजय शिवतारे उमेदवार आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाजी झेंडे हे उमेदवार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.