Danve-Khotkar
Danve-KhotkarSarkarnama

Jalna Assembly Constituency : अर्जून खोतकर यांनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट

Arjun Khotkar Meet Raosaheb Danve: अर्जून खोतकर यांनी भोकदरन येथे रावसाहेब दानवे यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. त्यानंतर आमचे मनोमिलन झाल्याचे खोतकर यांनी माध्यमांना सांगितले.
Published on

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारात भाजप सक्रिय नसल्याने खोतकर यांनी सोमवारी (ता.11) सकाळी भोकरदन येथे भाजप नेते रावसाहेब दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आमचे मनोमिलन झाल्याचे खोतकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे व अर्जुन खोतकर यांचे मनोमिलन न झाल्याचे सर्वांसमोर आले होते. त्या काळातील दानवे यांनी खोतकर यांची तीन वेळा भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

Danve-Khotkar
Jalna Assembly Constituency : जालना शहराला वेगळ्या उंचीवर नेण्याचा माझा संकल्प!

त्यानंतर विधानसभा निवडणूकीत भाजपकडून जालना विधानसभेची जागा मिळावी, यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र, महायुतीतील ही जागा शिवसेनेला सुटल्याने माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना उमेदवारी मिळाली. (Jalna) मात्र, लोकसभेला खोतकर प्रचारापासून काही काळ दूर राहिले. त्याचप्रमाणे भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे पदाधिकारी विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात प्रचारापासून दुरू राहीले आहेत.

Danve-Khotkar
Raosaheb Danve: फडणवीस मुख्यमंत्री होणार का? दानवेंच्या उत्तराने महायुतीच्या सीएमबाबत उत्सुकता वाढली

त्यामुळे आज शिवसेनेचे उमेदवार माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी भोकदरन येथे रावसाहेब दानवे यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. त्यानंतर आमचे मनोमिलन झाल्याचे खोतकर यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान विधानसभा निवडणुकीत राज्यभरात प्रचार दौरे सुरू आहेत. या व्यापामुळे मी अजून जालना विधानसभा मतदारसंघात गेलो नाही.

Danve-Khotkar
Mahayuti And MVA : विधानसभा निवडणुकीत 'आश्वासनांची स्पर्धा'; पण आर्थिक स्थितीचे काय?

खोतकर यांनी प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली आहे. त्यांनी विनंती केली नसती तरीही मी प्रचारात सहभागी होणार होतो. माझ्या डोक्यात लोकसभा किंवा अन्य काही नाही असे दानवे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालन्यात सभा आहे.

Danve-Khotkar
Jalna Assembly Constituency : गुंडगिरी, दडपशाही कोण करतो ? हे जालनेकरांना ठाऊक! माझा परिवार माळकरी..

या सभेला रावसाहेब दानवे उपस्थित राहिले नसते तर चुकीचा संदेश गेला असता. दानवे यांना सभेचे निमंत्रण आणि जुनं झालं गेलं ते विसरून निवडणुकीत सक्रीय व्हा, अशी विनंती खोतकर यांनी या भेटीत केल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com