Jayant Patil sarkarnama
महाराष्ट्र

Candidate List : जयंत पाटलांचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, चार उमेदवार जाहीर

Assembly election Jayant Patil SKP :सांगोल्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे. या जागेवर शेतकरी कामगार पक्षाaकडून दावा सांगितला जातो आहे.

Roshan More

Candidate list : महाविकास आघाडीत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पनवेल, उरण, पेणमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यातील या चारही जागा असून या चारही मतदारसंघात पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे.

अलिबागमध्ये मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करत चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली. अलिबागमधून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून पनवेलमधून बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सांगोल्याच्या जागेवर वाद

सांगोल्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे. या जागेवर शेतकरी कामगार पक्षाकडून दावा सांगितला जातो आहे. शेकापकडून बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असताना शिवसेनेमध्ये (यूबीटी) माजी आमदार प्रकाशआबा साळुंके यांनी प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून (यूबीटी) प्रकाशआबा साळुंके हे सांगोल्यातून उमेदवार असण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी?

शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांमधील जागावाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी उमेदवार घोषित केल्याने आघाडी बिघाडी झाल्याच्या चर्चा आहे.

शेकापचे रायगडमधील उमेदवार

अलिबाग - चित्रलेखा पाटील

उरण - प्रितम पाटील

पेण - अतुल म्हात्रे

पनवेल - बाळाराम पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT