Manoj Jarange Patil News : जरांगे पाटील लागले कामाला ; अंतरवालीत उमेदवार ठरवण्यासाठी गुरुवारी बैठकांचा धडाका

Manoj Jarange Patil will decide the candidate by holding a meeting at Antarwali : एकच उमेदवार रिंगणात राहील, अशी तयारी केली जात आहे. जो सांगतिल्यावर माघार घेणार नाही, तो मॅनेज झाला, असे समजले जाईल. इच्छुकांनी फक्त अर्ज न भरता, थेट बाॅन्ड घेऊन न येता आधी आमच्याशी चर्चा करा.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने काय भूमिका घ्यायची, याची स्पष्टता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. निवडणुकीत कुठे थेट उमेदवार द्यायचे, कोणत्या मतदारसंघात पाठिंबा द्यायचा अन् किती ठिकाणी अपक्ष किंवा लेखी हमी देणाऱ्याला निवडून आणायचे याचा सगळा प्लॅन मनोज जरांगे पाटील यांनी तयार केला आहे. भाजपची पहिली यादी आल्यानंतर जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत 24 तारखेला सकाळपासूनच जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन केले आहे.

या बैठकीत जिथे थेट उमेदवार द्यायचा आहे, त्या मतदारसंघातील एका नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. (Maratha Reservation) भरमसाठ अर्ज भरण्यापेक्षा तीन-चार अर्ज भरुन उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी ज्यांना माघार घ्यायाला सांगितले जाईल त्यांनी फाॅर्म परत घ्यायचे. एकच उमेदवार रिंगणात राहील, अशी तयारी केली जात आहे. जो सांगतिल्यावर माघार घेणार नाही, तो मॅनेज झाला, असे समजले जाईल, अशा सूचक इशाराही जरांगे पाटील माध्यमाशी बोलतांना दिला.

विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्पे ठरवण्यात आल्याचा उल्लेख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा केला. त्यानूसार जिथे उमेदवार निवडून येतील तिथेच उमेदवार देणार, एससी, एसटी मतदार संघामध्ये जे आपल्या विचाराचे लोक आहेत, आपल्या मराठा आरक्षण भूमिकेशी सहमत आहेत त्यांना त्या त्या मतदारसंघात मराठा समाजाची मत त्यांना द्यायची.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : "एवढा जातीयवाद कशासाठी?" महायुती सरकारच्या 'त्या' निर्णयावरुन जरांगे पाटलांचा संतप्त सवाल

तसेच ज्या मतदारसंघात आमचा उमेदवार नसेल तिथे जे उमेदवार मग ते कोणत्या पक्षाचे, जाती धर्माचे आहेत हे न पाहता जे आपल्या भुमिकेशी सहमत असल्याचे लेखी देतील त्यांना मराठा समाज मतदान करेल, असे जरांगे यांनी पुन्हा स्पष्ट केले. (Manoj Jarange Patil) दरम्यान, इच्छुकांनी फक्त अर्ज न भरता, थेट बाॅन्ड घेऊन न येता आधी आमच्याशी चर्चा करा. जिथे सगळ्या समीकरणांची जुळवाजुळव होईल तिथे आपल्याला ताकद दाखवायची आहे.

एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरले असतील तिथे ऐनवेळी ज्या एका नावावर एकमत होईल त्याचा अर्ज ठेवून इतरांना अर्ज मागे घ्यायला सांगितले जाईल. या अगोदर आम्ही महाराष्ट्रातील इच्छुकांची बैठक घेतली होती, ती निवडणूक लढाईची की पाडायचे यासाठी होती. तेव्हाच एका मतदारसंघात एकच उमेदवार द्या, तुमच्या मतदारसंघात तुमच्या बैठका घ्या, असे स्पष्ट केले होते.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : ज्यांनी मराठ्यांना संपवलं, त्याला संपवायचंच; जरांगेचा एल्गार, कुणाचे उमेदवार पाडणार?

आता 24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये जिल्हानिहाय बैठक घेऊन मी स्वत: एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यांनी फॉर्म भरले तर ते किचकट होईल. एका मतदार संघातून एक उमेदवार दिला तर ताकत लावता येईल. आपण त्या मतदार संघात एक फॉर्म ठेऊ आणि बाकीचे काढून घेऊ असे, जरांगे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com