Manoj jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : कुणाला निवडून आणायचं, कुणाला पाडायचं? मनोज जरांगेंनी पक्कं केलं...

Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Rajanand More

Mumbai News: मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. हा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी ‘साम टीव्ही’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत निवडणुकीत कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं, यावरही आपले मत ठामपणे मांडले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीसह महायुतीचे टेन्शनही वाढणार आहे.

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील निवडणुकीत आपले उमेदवार उतरणार, अशी चर्चा सुरू होती. पण त्यांनी सोमवारी माघारीचा निर्णय घेतला. त्यांनी राज्यभरातील त्यांच्या मराठा उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयानंतर जरांगे पाटील यांनी ‘साम टीव्ही’ला विशेष मुलाख दिली.

निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कुणाला पाडणार, कुणाला निवडून आणणार, यावर आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे पाटील म्हणाले, ते एक-दोन दिवसांत जाहीर करेन. सर्वांनी अर्ज काढून घ्यावेत, असे आवाहन करतोय. एका जातीवर निवडून येऊ शकत नाही. जे आपल्याला संपवायला निघालेत, त्यांना संपवायचे. आमचा कुणाला अपक्ष, महाविकास आघाडी आणि महायुती कुणालाच पाठिंबा नाही.

आपण पाडायचंय की निवडून आणायचंय, हे तुम्ही तुमचं ठरवा. पण आपल्या मागण्यांना पाठिंबा असल्याचे लिहून दिल्याशिवाय, व्हिडिओग्राफी केल्याशिवाय मते देऊ नका. आपल्या मागण्या असणाऱ्यांनाच निवडून आणा. वेळ पडल्यास ओबीसींचे निवडून आणा. लिहून दिल्याशिवाय कुणालाच मते देऊ नका, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

सातत्याने उपोषण करता, आंदोलन करता, नंतर काही काळाने तुम्ही माघार घेता असा आरोप होतोय, या प्रश्नावर बोलताना जरांगेंनी सांगितले की, विरोधकांना दुसरे काम काय असते. जे जळणारे आहेत, त्यांचे कामच हे आहे. ओबीसी आरक्षणात मराठ्यांना जाता येत नाही. त्यासाठी अध्यादेश काढला. मंत्री आले, बैठक घेतली, तरी मी उपोषण करायचे का? ही एक प्रक्रिया असते. राजकारण काही आमचा धंदा नाही. पाच-दहा जण निवडून गेले असते तर त्यांनी प्रश्न मांडले असते. म्हणून आम्ही लढण्यासाठीचा प्रयत्न केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT