Manoj Jarange Patil : निवडणुकीतून माघार पण मराठा आंदोलनाचं काय? जरांगे पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Assembly Election 2024 : उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशीच मनोज जरांगे पाटील यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी रविवारी त्यांनी कोणकोणते मतदारसंघ लढवणार याबाबतची यादी जाहीर केली होती.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशीच मनोज जरांगे पाटील यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे त्यांनी कालच म्हणजे रविवारी (ता.04) रोजी कोणकोणते मतदारसंघ लढवणार याबाबतची यादी जाहीर केली होती. अशातच आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

शिवाय आपण निवडणुकीतून माघार का घेत आहोत? याची कारणे देखील त्यांनी सांगितली. एका जातीवर निवडणून येणं शक्य नाही. शिवाय मित्रपक्षांची यादी वेळेत न आल्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये अशा सूचना त्यांनी केल्या.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : "मी त्यांची यादी..." जरांगे पाटलांच्या विधानसभा लढवण्याच्या निर्णयावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

पहाटे चार वाजेपर्यंत चर्चा

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, काल समाजबांधवाशी मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा झाली. पहाटे तीन-चार वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती. मित्रपक्षांची यादी अजून आलेली नाही. या चर्चेत सगळेच म्हणले एका जातीवर निवडून येणं शक्य नाही. त्यामुळे मी न लढण्याचा निर्णय घेतला.

आंदोलन सुरूच राहणार

तसंच त्यांनी यावेळी मराठा आंदोलन (Maratha) निवडणुकीनंतर सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, "निवडणूक हा काय आपला काय धंदा नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच राहणार आहे. आपण पुन्हा लढू आणि आरक्षण मिळवू.

Manoj Jarange Patil
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : बाळासाहेब ठाकरेंच्या नाव पुढचा हिंदुहृदयसम्राट उल्लेख गायब - राज ठाकरे

रात्री दीड तास चर्चा झाली या चर्चेत एका जातीवर लढायचं का? विचारलं असता सगळे नको म्हणाले. त्यामुळे सगळे नाही म्हणत असताना मी लढतो आणि पराभूत झालो तर तो आळ माझ्यावर येईल त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार नाही. मात्र, निवडणूक संपली की आपण पुन्हा आंदोलन करू."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com