Laxman Hake : करेक्ट कार्यक्रम! जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेल्या नेत्यांना लक्ष्मण हाकेंचा इशारा

Laxman Hake On Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय जाहीर करताच ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Manoj Jarange Patil, Laxman Hake
Manoj Jarange Patil, Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय जाहीर करताच ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जत्रा भरवणं सोपं असतं लढणं अवघड असतं, असं म्हणत हाकेंनी जरांगेंना डिवचलं. शिवाय ते बारामतीच्या स्क्रिप्टनुसार वागतात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याच्या निर्णयावर बोलताना लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले, "मी नेहमी सांगत होतो की, ते निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे पण जाणार नाहीत. लोकसभेला बारामतीच्या सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला. आता ओबीसी एकवटला आहे, त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे.

Manoj Jarange Patil, Laxman Hake
Manoj Jarange Patil : निवडणुकीतून माघार पण मराठा आंदोलनाचं काय? जरांगे पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

दिवसाला भूमिका बदलणारा माणूस

त्यांनी बारामतीकरांच्या सांगण्यावरूनच माघार घेतली. लढायला वाघाचं काळीज लागतं गनिमी काव्याचा काळ गेला." तसंच जरांगे पाटील म्हणजे दिवसाला भूमिका बदलणारा माणूस असल्याची टीका देखील हाकेंनी केली. ते म्हणाले, मुंबईच्या वेशीवरून माघारी आले. त्यांचा राजकारण, निवडणूक याचा अभ्यास नाही.

ज्यांनी जरांगेंना पाठिंबा दिला त्यांचा कार्यक्रम ओबीसी करणार आहेत. ज्यांनी त्यांना पत्र दिलं जे त्यांना भेटले त्यांचा कार्यक्रम करणार, असा इशारा देखील हाकेंनी यावेळी दिला. ओबीसीचा (OBC) समाजाचा वापर करून निवडून आले. आमचे पण काही उमेदवार आहेत. अनेक ठिकाणचे उमेदवार निवडून येणार आहेत.

Manoj Jarange Patil, Laxman Hake
Manoj jarange Patil: जरांगे म्हणाले ना, मात्र इरेला पेटलेले समर्थक ठाम; `या` मतदारसंघात उमेदवार देणारच!

10 ते 12 मतदारसंघात आमचे उमेदवार असून काही मतदारसंघात ओबीसींचे अनेक अर्ज आहेत. मराठवाड्यातील 7 ते 8 जिल्ह्यात आम्ही काम करत आहोत. ओबीसी 70 जागा लढणार आहेत तर 30 ते 35 ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com