PM Narendra Modi, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरेंना चॅलेंज; म्हणाले, आज 8 नोव्हेंबर, मी दिवस मोजणार..!    

Narendra Modi Challenge Uddhav Thackeray: पंतपधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

Rajanand More

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नाशिक येथील सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. मोदींनी संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांना उद्देशून निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसचे लोक वीर सावरकारांना शिव्या देतात. महाराष्ट्रात येऊन सावरकरांना अपमान करतात. मी ऐकलंय की आघाडीतील काही नेत्यांनी काँग्रेसच्या युवराजाला सांगितले, निवडणूक जिंकायचे असेल तर सावरकरांवर बोलू नका, असे सांगितले. त्यांच्या तोंडाला कुलूप लावले.

सर्वात मोठे दुर्दैव हे आहे की, सावरकरांचा वारसा सांगणारे आज आघाडीत काँग्रेसच्या सोबत उभे आहेत, असे म्हणत मोदींनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. माझे काँग्रेसच्या महाआघाडीतील साथीदारांना आव्हान आहे, या पक्षांनी काँग्रेसच्या युवराजाच्या, नेत्यांच्या तोंडून सावरकरांविषयी 15 मिनिट रोज आपल्या भाषणात प्रशंसा करून दाखवावी. पण युवराज कधीच सावरकरांची प्रशंसा करणार नाही.

वीर सावरकरांचे काळ्या पाण्याचे शिक्षेचे दिवस, देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला पण हे सगळे काँग्रेसला मान्य नाही. स्वातंत्र्याच्या लढाईत सावरकरांनी अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. त्याविषयी आघाडीतील पक्षांनी काँग्रेसच्या तोंडून प्रशंसा करून दाखवावी, असे आव्हान मोदींनी ठाकरेंचे नाव न घेता दिले. (Mahavikas Aghadi)

देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचे योगदान अतुलनीय आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडून बाळासाहेंबाच्या प्रशंसेचा एक शब्दही निघत नाही, अशी टीका करत मोदी म्हणाले, मी आघाडीतील काँग्रेसच्या मित्रांना हेही आव्हान देतो की, त्यांनी काँग्रेसचे नेते, युवराजांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंची, त्यांच्या विचारधारेची सार्वजनिकपणे प्रशंसा करून दाखवावी, असे आव्हानही मोदींनी दिले. (Mahayuti)

आज आठ नोव्हेंबर आहे. मी दिवस मोजणार आहे. महाविकास आघाडीकडून उत्तराचे वाट पाहीन. ते सावरकर, बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा करतात की नाही, याची वाट पाहीन. महाराष्ट्रही पाहील, असेही मोदी म्हणाले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी मोदींच्या या आव्हानाला कसे उत्तर देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT