Sharad Pawar, Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : शिवसेना पहिल्यांदा कुणी फोडली? भुजबळांच्या दाव्यानंतर पवारांकडून ‘एक घाव दोन तुकडे’

Sharad Pawar criticism Chhagan Bhujbal: शिवसेनाही ही पहिल्यांदा शरद पवारांमुळेच फुटली. माझ्यात शिवसेना फोडण्याची ताकद नव्हती, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

Rajanand More

Mumbai News : शिवसेना पक्षफुटीवर राष्ट्रवादी काँगेसचे नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भुजबळ हेच शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी तयार होते, असे सांगत पवारांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

‘साम टीव्ही’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनाही ही पहिल्यांदा शरद पवारांमुळेच फुटली. माझ्यात शिवसेना फोडण्याची ताकद नव्हती, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता.

भुजबळांच्या या दाव्यावर बोलताना पवार म्हणाले, मी त्यावेळी कोणत्या पक्षात होतो? मी शिवसेनेत नव्हतो. माझी जबाबदारी काय? माझ्या विरोधी पक्षाला शक्ती द्यायचं काम माझं आहे की त्यांना कमकुवत करायचं काम? मला आमचा पक्ष मजबूत करायचा असेल तर त्या पक्षाला कमजोर करणाऱ्या ज्या शक्ती, संघटना आहेत त्यांच्यावर आमचा आघात राहणार. आपली शक्ती वाढेल कशी याची खबरदारी मी घेणार.

भुजबळ हे त्यावेळी शिवसेनेत अस्वस्थ असल्याचे सांगताना पवार म्हणाले, ज्यावेळी आमच्या लक्षात आले की छगन भुजबळ आणि त्यांचे काही सहकारी या पक्षात अस्वस्थ आहेत, बाहेर पडायच्या मार्गावर आहेत. ते संपर्क साधू इच्छितात. जरूर मी संपर्क साधला. त्यामध्ये काही चुकीचे नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.

अदानींसोबतच्या भेटीचा दावा फेटाळला

'उद्योजकांच्या मर्जीने राजकारण होऊ शकत नाही,' असे शरद पवारांनी मुलाखतीत सांगितले. पहाटेच्या शपथविधीच्या आधी शरद पवारांची गौतम अदानी आणि अमित शहांसोबत बैठक झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला होता.

हा दावा खोडून काढताना शरद पवार म्हणाले, सरकार स्थापन झालं नाही तर चर्चा कशाला करायची? पण ही गोष्ट खरी आहे की, मी अनेक वेळा अजित पवारांना घेऊन अनेकांसोबत बैठक घेतली आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना मी एकदा काय तीन ते चार वेळा भेटलो असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT