Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल? मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, आकडाच सांगितला...

Maharashtra Assembly Election Result Maratha Reservation Mahayuti, Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्याने जरांगे फॅक्टर फेल झाल्याची टीका काही जणांकडून केली जात आहे.

Rajanand More

Jalna News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील चर्चेत आले आहेत. महायुतीतील काही नेत्यांकडून जरांगे फॅक्टर निवडणुकीत फेल झाल्याचा दावा केला आहे. महायुतीला मोठे यश मिळाल्याने नेत्यांकडून हे ठामपणे सांगितले जात आहे. त्यावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  

निकालावर बोलताना जरांगे पाटील यांनी महायुतीचे अभिनंदनही केले आहे. जरांगे फॅक्टर फेल झाल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, आम्ही मैदानातच नव्हतो. जे निवडून आलेत तो सगळा फॅक्टर मराठ्यांचाच आहे. सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आले आहे. मराठा बंधनमुक्त केला होता. कुणाचाही दावणीला समाज बांधला नव्हता. मराठ्यांशिवाय या राज्यात कुणाचाही सत्ता येऊ शकत नाही.

काल फडणवीसांनी सांगितले, मराठा समाज भाजपसोबत होता. आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांनाही द्यायचं. मराठ्यांशिवाय या राज्यात कुणाचंही पान हलत नाही. फॅक्टर बाहेरच नाही तर फेल कसा. फॅक्टर बाहेर आला असता तर तुमचं दुकान पडलं असतं. मराठ्यांच्या नादी लागणे सोपे नाही. कुणाचेही सरकार आले तरी आम्हाला आंदोलन करावे लागणार होते, म्हणून आम्ही कुठे गेलो नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा फॅक्टर घाबरूनच मराठ्यांना तिकीटे दिली. म्हणून तर 204 निवडून आले. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला, तुमची हयात जाईल. एक महिनाभर थांबा, तुम्हाला कळेल, मराठ्यांची ताकद काय, हा फॅक्टर किती डेंजर आहे? मराठ्यांचे 204 आमदार निवडून आलेत. आमचा कोणत्याच उमेदवारावर राग नाही. आता बघा पुन्हा कशी मराठ्यांची लाट उसळते, असे इशाराही जरांगे पाटलांनी दिला.

मराठा समाज सगळ्या पक्षात विखुरला आहे. आता आंदोलन पुकारले तर सर्वजण एका बाजूला असतील. आता राजकारण संपले. ज्यांनी मराठ्यांची मते घेतली, त्या सर्वांनी मराठ्यांच्या मदतीला जायचे. निवडून आलेले आणि पराभूत झालेल्या सर्वांनी मदत करायची. मराठ्यांची विभागणी होऊ शकत नाही. मी मराठा समाज राजकारण्यांच्या दहशतीपासून मुक्त केला आहे. मराठा ताकदीने एकजूट झाला आहे. त्यामुळे त्यांना बांधून ठेवले नाही. कुणाचेही सरकार आले तरी आम्हाला देणंघेणं नाही. आम्ही मैदानातच नव्हतो. मैदानात असतो तर धुरळा उडवला असता सगळ्यांचा, असे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT