Malshiras politic's : आमदारकी, आर्थिक बळ दिलं; पण मोहिते पाटलांनी भाजप कार्यकर्त्यांनाच धमक्या दिल्या; पराभवानंतर फडणवीसांचा निकटवर्तीय नेता आक्रमक

Assembly Election Result : माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. भाजपचा कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.
Ram Satpute-Ranjitsinh Mohite Patil
Ram Satpute-Ranjitsinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 November : भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते यांचा माळशिरस मतदारसंघातून निसटता पराभव झाला. मतदारसंघात कोणताही बडा नेता सोबत नसताना राज्याच्या राजकारणातील बलाढ्य समजले जाणाऱ्या मोहिते पाटील घराण्याशी दोन हात करत सातपुते यांनी निकराची झुंज दिली. शर्थीने खिंड लढवूनही अपयश पदरी आलेल्या राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपतून हकालपट्टी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार सातपुते यांनी केली आहे.

राम सातपुते (Ram Satpute) यांनी सोशल मीडियातून आमदार मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे. आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर केलेल्या पोस्ट राम सातपुते यांनी म्हटले आहे की, माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. भाजपचा कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप (BJP) कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.

भाजपने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना (Ranjitsinh Mohite Patil ) आमदारकी दिली. साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली, त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केले. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. रणजितसिंह मोहिते पाटील यांची तत्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

Ram Satpute-Ranjitsinh Mohite Patil
Solapur Assembly Result : अख्ख्या राज्यात 10 जागा जिंकणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापूरने दिले चार आमदार

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघात भाजपचे राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांना विजयासाठी झुंजायला लावले. वास्तविक लोकसभा निवडणुकीत एकट्या माळशिरसमधून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना ८० हजारांपेक्षा जास्त मतांचे लीड मिळाले होते, त्यामुळे जानकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, उत्तम जानकर यांचा अवघ्या 13 हजार 147 मतांनी विजय झाला.

विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना 1 लाख 21 हजार 713 मते मिळाली आहेत, तर त्यांच्या विरोधातील उमेदवार राम सातपुते यांना 1 लाख 08 हजार 566 मते पडली आहेत. विजयाचे अंतर केवळ 13 हजार 147 मतांचे राहिलेले आहे. यात मोहिते पाटील यांची भूमिका निर्णायक राहिली आहे. त्याच मोहिते पाटलांवर राम सातपुते यांनी हल्लाबोल केला आहे.

Ram Satpute-Ranjitsinh Mohite Patil
Narayan Patil Won : ‘तो’ निर्णय ठरला टर्निंग पॉईंट अन्‌ नारायण पाटलांनी 2019 च्या पराभवाचं उट्टं काढलं

भाजपसोबत असताना मोहिते पाटलांच्या साखर कारखान्यांना आणि संस्थांना मदत करण्यात आली. त्याचबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत माढ्यातून तिकिट नाकारण्यात आल्यानंतर मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com